भारतातच नव्हे तर जगभरात महेंद्रसिंग धोनी माहित नाही असा व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे. हो कारण धोनीने त्याच्या कर्तृत्वाने एवढे नाव कमावलं आहे की त्याला जगभरातील लोक ओळखतात आणि त्याच्यावर मनापासून प्रेमही करतात. शिवाय इतर क्रिकेटरच्या फॅन्सपेक्षा धोनीचे फॅन्स काही वेगळ्याच लेव्हलला त्याच्यावर प्रेम करतात, असं म्हटलं जातं. मात्र, धोनीवर प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यांना त्याच्याबद्दलची एक गोष्ट माहिती नाही, ती म्हणजे एमएस धोनीला एक भाऊदेखील आहे. हो हे खरं आहे. कारण धोनीच्या अनेक चाहत्यांना अजून माहिती नाही की, धोनीला मोठा भाऊ आहे आणि त्याचे नावही त्यांना माहीत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, सध्या सोशल मीडियावर काही लोकांनी महेंद्रसिंग धोनीचा भाऊ नरेंद्रसिंग धोनीबद्दल माहिती मिळवली आहे. नुकतेच एका ट्विटर वापरकर्त्याने नरेंद्रसिंग धोनीचा एक जुना फेसबुक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “हेच कारण आहे की एमएस धोनीने त्याच्या बायोपिकमध्ये आपल्या भावाची ओळख करून दिली नाही.” शिवाय हा फोटो शेअर करताना त्याने नरेंद्रसिंग धोनीची टीकात्मक कवितादेखील शेअर केली आहे.

धोनीच्या भावाचा फोटो व्हायरल –

हेही पाहा- असा जुगाड असेल तर धान्य दळण्यासाठी गिरणीत जायची गरजच काय? IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला भन्नाट Video पाहाच

चाहत्यांनी नरेंद्रसिंग धोनीचे सोशल मीडिया अकाउंट सर्च केले असून ते सध्या त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. @1no_aalsi_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन नरेंद्रच्या जुन्या फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शिवाय या पोस्टमुळे आता धोनीचे चाहतेदेखील विचारात पडले आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, “धोनी सोशल मीडिया का वापरत नाही?” तर आणखी एकाने आश्चर्याने विचारले, “खरं आहे का?” तर नरेंद्रसिंग धोनीचे इंस्टाग्रामवरील काही फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

झिवाबरोबरचे फोटोही व्हायरल –

नरेंद्रसिंग इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टीव्ह नसतानाही अनेक चाहते त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक पोस्ट्स आहेत. २०१७ पर्यंतच्या पोस्टवरही लोकांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे. या जुन्या पोस्टमधील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नरेंद्रने महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवासोबतचे काही फोटोही शेअर केले होते.

राजकारण सक्रिय –

महेंद्रसिंग धोनीपेक्षा दहा वर्षांनी मोठे असलेले नरेंद्र राजकारणात आहेत. २०१३ पासून ते समाजवादी पक्षाशी संबंधित आहेत. यापूर्वी ते भाजपचे सदस्य होते. नरेंद्रसिंग धोनीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याने एकदा एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याचे धाकट्या भावासोबत चांगले संबंध आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photos of ms dhonis brother narendra singhs went viral on social media netizens asked the question jap