Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षा हजारो तरुण नोकरी आणि शिक्षणासाठी पुणे शहरात येतात.पुणेरी पाट्यांपासून पुणेरी खाद्यपदार्य, येथे सर्वच काही लोकप्रिय आहे.सोशल मीडियावरही पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हेल्मेट घालून दुचाकी चालवताना दिसत आहे. पण त्याने घातलेले हेल्मेट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवा हेल्मेट ट्रेंड तुम्हाला पाहायला मिळेल.त्याने कार्टूनचे हेल्मेट घातले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील एका रस्त्यावरील आहे. रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट केलेला आहे. रस्त्यावर एक तरुण दुचाकी चालवताना दिसत आहे. या तरुणाने डोक्यावर हेल्मेट घातलेले दिसत आहे. पण हे हेल्मेट पाहून तुम्हाला वाटेल की हे खरंच हेल्मेट आहे की सशाचा चेहरा आहे? होय, या तरुणाच्या हेल्मेटचा आकार सशाच्या चेहऱ्यासारखा आहे. दूरुन कुणाला वाटेल की सशाचा चेहरा आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की हा पुणेकरांचा नवा हेल्मेट ट्रेंड आहे का? सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Optical Illusion : लपलेले ‘E’ अक्षर शोधून दाखवा, अर्धा तास घ्या तरीसुद्धा शोधू शकणार नाही…

punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकर, हेल्मेट या ट्रेंडनी घालु शकता” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “पुर्वी माकड टोपी वापरायचे तसाच काहीसा प्रकार वाटतोय” तर एका युजरने लिहिलेय, “हा पुणेकर नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुण्यात काय आता साताऱ्यात पण आलेत असली”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video a young man wearing cartoon style new trend helmet video goes viral ndj