Pune viral video: ‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. सोशल मीडियावर कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर तुमचाही संताप होईल. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पुणेकरांची मान खाली घालणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अशा लोकांचं करायचं तरी काय?
एका रिक्षाचालकाला रस्त्यावर थुंकताना पकडलं गेलं. पण यावेळी म्हणजे, त्यानं आपली चूक मान्य करण्याऐवजी “मी टॅक्स भरतो” असं उलट उत्तर दिलं.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाड्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्या आहेत. दरम्यान, एक रिक्षाचालक पुढे उभ्या असलेल्या ट्रकच्या चाकाखाली थुंकतो. लक्षवेधी बाब म्हणजे, या प्रकरणात जेव्हा मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं त्याच्याकडे जाब मागितला, तेव्हा त्यानं आपली चूक मान्य करणं अपेक्षित होतं. पण उलट तो म्हणाला, “मी थुंकण्याचा टॅक्स भरतो.” यानंतर हा तरुण त्याला पुन्हा विचारतो की थुंकण्याचा टॅक्स भरतो का? तर यावरही तो होकारार्थी मान हलवत उत्तर देताना दिसत आहे. तसेच आपण काहीही चुकीचं केलेलं नाहीये अशा अविर्भावात तो दिसतोय.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DKAAEjAPl68/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडीओ १९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी या प्रकरणी जोरदार टीका केली आहे. कोणी म्हणतंय, “रस्त्यावर थुंकणे हा मानसिक आजार आहे,” तर कोणी अगदी योग्य केले आता ह्याला ते साफ करायला लावले पाहिजे अश्या छपरी लोकांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे तरच असले छपरी सुधरतील, असं म्हणत या रिक्षाचालकावर कठोर कारवाईची मागणी करत आहे.