Puneri pati: पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच चोर घरावरही लक्ष ठेवून असतात. मात्र एका पुणेकरानं आपल्या बंगल्याबाहेर एक पाटी लावली आहे. ही पाटी वाचून कोणीही या बंगल्यात जाण्याचा विचार करणार नाही, तसेच चोरही ही पाटी पाहून माघारी फिरतील. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या बंगल्याबाहेर लावलेल्या पाटीवर “ या घरी आतापर्यंत तीन वेळा चोरी झाली आहे. तेव्हा आमचे सोने, पैसा बँकेत आहे. कृपया घरचे कुलुपस दरवाजे तोडून आपला वेळ व श्रम वाया घालवू नये.”

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> “आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri patya viral only punekars know how to make and deal with thief funny puneri pati srk