उकाड्याने हैराण झाल्याने आता सर्वच जण पावसाची आतुरने वाट पाहत आहेत. केवळ माणसंच नाही तर प्राणीदेखील सतत वाढणाऱ्या उकाड्याने वैतागले आहेत. एवढ्या भयंकर उन्हात जर अचानक पाऊस सुरू झाला तर कोणाला आनंद होणार नाही, असाच आनंद एका उंदराला झाला आहे. तुम्ही आतापर्यंत पावसात आनंदाने नाचणारा मोर पाहिला असेल, पण एक उंदीर नाचतोय. कडाक्याच्या उन्हात हैराण झालेला उंदीर पाऊस सुरू होताच चक्क उड्या मारत नाचू लागला; जणू काही तो याचीच वाट पाहत होता. पावसात नाचणाऱ्या उंदराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसात आनंदाने नाचू लागला उंदीर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक उंदीर रस्त्याच्या मधोमध नाचताना आणि उडी मारताना दिसत आहे. उष्णतेमुळे आता सगळेच हैराण झाले आहेत, अशा परिस्थितीत या उन्हात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर होणारा आनंद काही औरच असतो. पण, या पावसाचा आनंद फक्त माणूसच घेत नाही तर प्राणीही घेताना दिसतात. पण, आतापर्यंत तुम्ही लहान मुलं पावसात रस्त्यावर उड्या मारत नाचताना पाहिली असतील, पण व्हायरल व्हिडीओत चक्क एक उंदीर अगदी लहान मुलांप्रमाणे उड्या मारत आनंदाने नाचतोय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

राहुल गांधी होणार पंतप्रधान; डीके शिवकुमार यांनी घेतली चंद्राबाबू नायडूंची भेट? व्हिडीओच्या तपासात काय कळलं?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंदीर पावसात आधी आरामात भिजतो आणि नंतर पावसात उडी मारून आपला आनंद व्यक्त करतो. अनेक दिवसांपासून या पावसाची वाट पाहत असलेला उंदीर पावसात आनंदाने उड्या मारत आहे. उंदराच्या नाचण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मजेशीर व्हिडीओवर युजर्स भन्नाट भन्नाट प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

कावळ्याचा कारनामा! चक्क शेतकऱ्याचे अर्धे शेत टाकले उपटून; VIDEO वर युजर्स म्हणाले…

उंदाराचा हा मजेशीर व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर युजर्स फार मजेशीर कमेंट्स देत आहेत. एका युजरने लिहिले की, सर्व जण उष्णतेने हैराण झाले आहेत, पाऊस पडला तर उंदराचे नाचणे तर स्वाभाविकच आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, व्वा, क्या बात है, मी मोर नाचताना पाहिला होता, मी पहिल्यांदाच उंदीर नाचताना पाहत आहे; तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, नाचणारा उंदीर.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rat happy with the rain and see dancing jumping in the rain video viral sjr