Viral Video :- आक्रमणांपासून देशाचे संरक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता राखणे, नागरिकांच्या संकट काळात त्यांची मदत करणे; ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्ये आहेत. भारतीय लष्करात मोलाची कामगिरी बजावणारे अधिकारी त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी लढत असतात. तर आज सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे निवृत्त जनरल अधिकारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ शिकागोमधील आहे, जिथे लग्नसमारंभ सुरू आहे आणि हा लग्नसमारंभ भारतीय लष्कराचे निवृत्त जनरल अधिकारी सतीश दुआ यांच्या भाचीचा आहे; तर व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की , नवरा-नवरी बसले आहेत आणि त्यांच्या अगदी समोरच भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी सतीश दुआ त्यांच्या डान्सचे कौशल्य दाखवताना दिसून येत आहेत. व्हिडीओत ‘क्रांती’ या हिंदी चित्रपटातील “हायो रब्बा हायो रब्बा” हे गाणं वाजताना ऐकू येत आहे आणि याच गाण्यावर ठेका धरत सतीश दुआ अगदी हुबेहूब डान्स स्टेप्स करताना दिसून येत आहेत. काळ्या रंगाचा कोट चढवून, भांगडा करत, अगदी जोशमध्ये सतीश दुआ हे कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसत आहेत. एकदा बघाच हा व्हिडीओ.

सतीश दुआ हे भारतीय लष्कराचे निवृत्त जनरल अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि काश्मीरमधील माजी १५ कॉर्प्सचे इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून काम केले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईकदरम्यान जनरल ऑफिसर काश्मीर कॉर्प्स कमांडर होते. ते जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फ्रंटी रेजिमेंटचे कर्नल होते.

हेही वाचा… बाईक चालवताना केलेली एक चूक बेतली जीवावर! तरुणाबरोबर घडली भयंकर घटना! Video आला समोर

व्हिडीओ नक्की बघा :-

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ (The Satish Dua ) यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शनदेखील दिले आहे, ज्यात लिहिलं आहे की, “असे डान्स करा, जसे कोणी तुम्हाला बघत नाही आहे. शिकागोमध्ये माझ्या भाचीच्या लग्नात मला डान्स करण्याचा आग्रह करण्यात आला म्हणून मी भारतीय लष्कराचा जोश दाखवला. हाउज द जोश ? ” असे कॅप्शन सतीश दुआ यांनी त्यांच्या या व्हिडीओला दिले आहे. व्हिडीओ पाहणारे अनेकजण त्यांच्या डान्स कौशल्याचे कौतुक करताना कमेंटमधून दिसून येत आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired indian army general officer satish dua show best dance perfomance in chicago asp