बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांच्या बेशरम रंग गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दीपिकाचा असा बोल्ड अंदाज तु्म्ही याआधी कधी पाहिला नसेल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गाण्याचं वेड तरुणांना लागलेलं दिसतंय. कारण गावाकडच्या अशाचा एका तरुणाने बेशरम रंग या गाण्याचं रिक्रिएशन करुन बोल्ड अंदाजात डान्स करत थेट शाहरुख दीपिकालाच टक्कर दिली आहे.
दीपिका आणि शाहरुखची सिझलिंग केमेस्ट्री पाहून तमाम चाहत्यांच्या मनाला भूरळ पडली आहे. बेशरम सॉंग दिवसेंदिवस लोकप्रीय होत आहे. गाण्यात असलेला बोल्ड अंदाज पाहून काही तरुणांन याच गाण्यावर थिरकण्याचं वेड लागलं आहे. एका तरुणाने दीपिकाने केलेल्या दिलखेचक अदा जशाच्या तशा कॅमेरासमोर करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणासोबत त्याचे मित्रही जबरदस्त ठुमके लगावताना या व्हिडीओत दिसत आहेत. तरुणाने बेशरम रंग या गाण्यावर रिक्रिएट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनं नेटकऱ्यांना आकर्षीत केलं असून भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही या व्हिडीओवर होत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ moodydamsel नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. बेस्ट व्हर्जन ऑफ बेशरम रंग सॉंग असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला जवळपास ३८००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ७०० हून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं, “शाहरुख आणि दीपिकापेक्षा चांगला व्हिडीओ आहे.” काही नेटकऱ्यांनी शाहरुख-दीपिकाच्या गाण्याला नापसंती दर्शवली आहे. #boycottpathaan असा ट्रेंडही सुर झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी २५ जानेवारीला पठाण सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.