Pathaan Viral Scene: पठाण चित्रपटातील तो सीन तुफान व्हायरल, शाहरुख खानच्या जबरा फॅनने दिली सलामी | Shahrukh khan pathaan movie beautiful scene viral fan salutes on screen at multiplex hardik mehta shares post on instagram nss 91 | Loksatta

Pathaan Viral Scene: पठाण चित्रपटातील तो सीन तुफान व्हायरल, शाहरुख खानच्या जबरा फॅनने दिली सलामी

पठाण चित्रपटातील एक जबरदस्त सीन दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Pathaan Movie Viral Scene Of Shahrukh Khan
पठाण चित्रपटातील जबरदस्त सीन व्हायरल झाला. (Image-Instagram)

कोट्यावधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईल बनलेला बॉलिवडूचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची चर्चा जगभरात रंगलीय. कारण दाक्षिणात्य सिनेमांचे विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेनं पठाण चित्रपट वाटचाल करताना दिसत आहे. दीपिकाच्या दिलखेचक अदा, जॉन अब्राहमचा थरार आणि शाहरुखची खतरनाक अॅक्शन पाहण्यासाठी शेकडो प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी चाहते शाहरुखचं स्वागत करताना दिसत आहेत. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकलेल्या शाहरुखने कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कारण पठाण चित्रपट सुरु असताना एका चाहत्याने थेट किंग खानला सलामीच दिली आहे. पठाण चित्रपट इतका गाजला आहे की, शेकडो प्रेक्षक चित्रपटगृहात टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांचा गजर वाजवून स्क्रीनजवळ जाऊन जल्लोष करताना दिसत आहेत.

दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

बाहुबली, केजीएफ सारख्या सिनेमांनी जगभरात डंका वाजवला. पण आता बॉलिवडूचा पठाण चित्रपटही सिनेविश्वात धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवडू इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारही चित्रपटगृहात प्रवेश करताना व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने दोन दिवसांतच १५० कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाण चित्रपट नवीन विक्रम करणार, असा अंदाज चित्रपट सृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत.

पठाण चित्रपटातील शाहरुख खानचा जबरदस्त सीन दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये मेहता यांनी म्हटलंय, पठाण चित्रपट सुरु असताना आमच्या समोरील एक जण अचानक उभा राहिला आणि त्याने भावनिक होऊन थेट सलामीच दिली. शाहरुख खानने घेतलेला निर्णय गेल्या दशकातील सर्वात जबरदस्त निर्णय आहे. यशराज फिल्मचं खूप अभिनंदन. २०१३ वर्ष हे फक्त खान साहेबांसाठी आहे. शाहरुख खानला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

नक्की वाचा – Viral Video : पठाण चित्रपटातील ‘तो’ सीन सुरु होताच शेकडो प्रेक्षकांनी स्क्रीनजवळ धाव घेतली अन् घडलं…

इथे पाहा व्हायरल पोस्ट

पठाण फ्लॉप झाला या ट्रेंडमुळं उडाली खळबळ

२७ जानेवारीपासून #फ्लॉपहुईपठाण असे भन्नाट मिम्स नेटकरी ट्वीटरवर शेअर करताना दिसत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका चित्रपटगृहात प्रेक्षकांनी झुमे जो पठाण गाणं सुरु होताच जल्लोष सुरु केला होता. स्क्रीनवर सिनेमा सुरु असतानाच शाहरुख खानच्या चाहत्यांना पठाणची भुरळ पडली आणि टाळ्यांसह शिट्ट्यांचा गजर वाजू लागला. सिनेमाला जबदस्त प्रतिसाद दिल्याचे शाहरुख खानच्या चाहत्यांचे काही व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाले होते. मात्र, दोन दिवसांनंतर सोशल मीडियावर पठाण फ्लॉप झाला, असा ट्रेंड सुरु झाल्याने सोशल मीडियावर सर्वच चक्रावून गेले आहेत.

नक्की वाचा – Viral : ‘पठाण झाला फ्लॉप’; ‘त्या’ चित्रपटगृहातील व्हायरल व्हिडीओमुळं सिनेविश्वात खळबळ

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 15:09 IST
Next Story
मुंबईच्या मराठा मंदिरात शाहरुख खानच्या पठाण आणि DDLJ ची स्क्रीनिंग एकत्र; चाहते म्हणाले “एक तिकीट…”