Accident video: सोशल मीडियावर दररोज अपघातांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे घडून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. ‘अतिघाई संकटात नेई’, असे म्हणतात. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून आला आहे. काही वेळा लोक घाई-गडबडीत अशा चुका करतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतातात. मात्र, समोर आलेल्या अपघातात अतिघाई अंगलट आली आहे.

दिल्लीतील मुकर्बा चौकातील एका ओव्हरब्रिज फ्लायओव्हरवरून एक अनियंत्रित कार थेट रेल्वे रुळावर आदळली. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे एक तास विस्कळीत झाली. अतिवेगाने येणाऱ्या कारने एका दुचाकीलाही धडक दिली आणि दोन्ही वाहने आणि चालक थेट रुळांवर पडले. स्थानिकांनी आणि दिल्ली पोलिसांनी कार रुळावरून हलवली आणि रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली.अपघातात चालक जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कार अतिवेगाने असल्याने उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराला धडकली आणि रेलिंग तोडून ती थेट रेल्वे रुळांवर पडली. सुदैवाने, त्यावेळी रुळांवरून कोणतीही ट्रेन जात नव्हती आणि मोठी दुर्घटना टळली.

व्हिडिओमध्ये गाडी रुळावरून बाजूला सरकताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांना घटनास्थळी कळवण्यात आले आणि त्यांनी क्रेनच्या मदतीने गाडी रुळावरून बाहेर काढली.प्रवासासाठी कुठेही निघाल्यावर रस्ते मोकळे मिळतील तेव्हाच शक्य तितका प्रवास उरकण्याचा अनेकांचा बेत असतो.मात्र कधी कधी ही घाई जिवावर बेतू शकते.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “दिल्ली: मुकरबा चौकाजवळ एक कार उड्डाणपुलावरून पडली आणि रेल्वे ट्रॅकवर पडली, ज्यामुळे गाडीचा चालक जखमी झाला.”