सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतात. यातील बहुतांश व्हिडीओ हे विषारी सापांचे आहेत. कधी-कधी सापाच्या हल्ल्याचे असे व्हिडीओ पाहायला मिळतात ज्यामुळे नेटीझन्सना घाम फुटतो. आजही आम्ही तुम्हाला असाच एका व्हिडीओबद्दल सांगणार आहोत, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका विषारी सापाचे चुंबन घेताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक विषारी साप फणा पसरवत बसलेला दिसत आहे. त्याचवेळी एक मुलगी येते आणि सापाला किस करू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप सुद्धा यावर काहीच रीअॅक्ट करत नाही. ती मुलगी त्या सापाला बराच वेळ दोनदा चुंबन करते. सहसा हे पाहिले जात नाही, त्यामुळे हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

(हे ही वाचा: शिकारीसाठी विषारी साप घुसला घरट्यात, पक्ष्यांच्या जोडीनेही दिलं चोख प्रत्युत्तर; बघा Viral Video)

(हे ही वाचा: हजारो फूट उंचीवर बंद पडले हेलिकॉप्टर, इंजिन सुरू करण्यासाठी पायलटने हवेतच बाहेर येऊन…;बघा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ rasal_viper या इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक खूपच आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते त्यांच्या मित्रांच्या कुटुंबासह व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओवर यूजर्सकडून अनेक कमेंट्स येत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले की “हे खूप धोकादायक आहे” तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की “ही मुलगी मृत्यूच्या अगदी जवळ होती”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking netizens were shocked to see viral video of girl kissing a poisonous snake ttg