सोशल मीडियावर कधीकधी अशा काही बातम्या व्हायरल होत असतात, ज्या वाचल्यानंतर आपणाला धक्का बसतो. सध्या अशीच एका रेस्टॉरंटमधील बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर जगभरातील विविध लोक वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खातात. अनेक ठिकाणी तर कीटक, प्राणी आणि पक्ष्यांनाही सोडलं जात नाही. शिवाय अनेक प्राणी असे असतात ज्यांना आपण खायचा विचारही करु शकत नाही, अशा प्राण्यांनाही चीनमध्ये आवडीने खाल्लं जाते. त्यामुळे कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही असं आपण म्हणत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकांनी काहीही खाल्लं तरीही तुम्ही माणसाने माणसांचे रक्त पिल्याचं ऐकलं आहे का? नाही, हेच तुमचं उत्तर असणार यात शंका नाही. पण सध्या जपानमधील एका तरुणीने अनेक लोकांना आपलं रक्त पाजल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जपानमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारी तरुणी दारूसह इतर पेयांमध्ये स्वत:चे रक्त मिसळून लोकांना देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना व्हायरल होताच रेस्टॉरंटने तरुणीला कामावरुन काढून टाकलं आहे.

हेही पाहा- लेडीज सीटवर पुरुष बसल्याने दोन बायकांमध्ये राडा; Video पाहून लोक म्हणाले, “फ्री तिकीटचा परिणाम”

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील मोंदाइजी कॉन कैफे दाकू (प्रॉब्लेम चाइल्ड डार्क कॅफे) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आहे. शिवाय या कॅफेत मूकबधिरांना काम दिले जाते. लोक येथे विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी आणि पेय किंवा दारु पिण्यासाठी येतात. मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींनाही या रेस्टॉरंटमध्ये कामावर ठेवलं जातं.

तरुणी स्वतःला व्हॅम्पायर समजू लागली –

हेही पाहा- Video: अतिक अहमदची हत्या करणाऱ्या आरोपीचे शेवटचे Reel व्हायरल, रीलमधील गाणे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

जपानमध्ये एक खास संकल्पना चर्चेत आहे ती म्हणजे हॉटेलमधील वेटरना भितीदायक कपडे घालायला दिले जातात. या रेस्टॉरंटमध्येही अशी थीम बनवण्यात आली होती. ज्यामध्ये तेथील वेटर भितीदायक कपडे घालायचे, या तरुणीनीने देखील असे कपडे घातले होते. मात्र, हे कपडे घातल्यानंतर ती स्वत:ला व्हॅम्पायर समजू लागली आणि ती रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांच्या पेयांमध्ये स्वत:चे रक्त मिसळून त्यांना प्यायला देऊ लागली.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या तरुणीला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. मात्र, यावरूनही रेस्टॉरंटवर टीका होत आहे. मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलींना कामावर ठेवल्यास असेच होईल, असे लोक म्हणत आहेत. तर माणसाचे रक्त पिल्याने लोक आजारी पडू शकतात असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking news in japan the female waiter was feeding people by mixing her own blood in the drink jap