shocking story: तरुणाईसाठी ही एक मोठी शिकवण आहे! एका क्षणिक आकर्षणाने घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी कसा शाप ठरू शकतो, याचं उदाहरण म्हणजे चीनमधील वांग शांगकुनची कहाणी. आजच्या काळात महागडे मोबाईल्स, गॅझेट्स आणि ट्रेंड्सच्या मागे लागलेली तरुण पिढी काहीही करून ते मिळवण्याच्या प्रयत्नात असते. पण, कधी कधी हा मोह जीवावरही बेतू शकतो. अशाच प्रकारे केवळ १७ वर्षांच्या वयात एका तरुणाने आयफोन घेण्यासाठी आपली किडनी विकली आणि आज ३१ व्या वर्षी तो आयुष्यभरासाठी डायलिसिस मशीनवर अवलंबून आहे.

वांग शांगकुन गरीब कुटुंबातील असल्याने, २०११ मध्ये आयफोन ४ आणि आयपॅड २ खरेदी करण्यासाठी त्याने किडनी कळकिणीच्या बाजारात २०,००० युआन (सुमारे २.५ लाख रुपये) मध्ये विकली. त्यावेळी त्याला वाटले की एक किडनी दिल्याने त्याचे जीवन चालेल, परंतु त्याने होणाऱ्या गंभीर जोखमींचा विचार केला नव्हता. किडनी विक्रीसाठी तो एका ऑनलाइन चॅट रूममध्ये अंग तस्करांच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकला.तस्कराने त्याची फसवणूक करत पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि वांग यामध्ये फसला

त्याची शस्त्रक्रिया एका छोट्या स्थानिक रुग्णालयात झाली, जिथे सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. ऑपरेशननंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे काही महिन्यांतच वांगची दुसरी किडनी संक्रमित झाली. रुग्णालयात तपासणीत समजले की त्याच्या किडनीची कार्यक्षमता फक्त २५ टक्के उरली आहे. आज ३१ वर्षांच्या वांगला दररोज डायलिसिसवर राहावे लागते आणि तो पूर्णपणे अपंग झाला आहे.

वांगची कथा आजच्या युवकांसाठी गंभीर संदेश देते. महागड्या आयफोनसारख्या गॅझेटसाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा मोह अनेकांना होतो. वांगची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, तो स्वतः अनुभव सांगून इतरांना अशाच चुकीच्या निर्णयांपासून सावध करण्याचा प्रयत्न करतो. ही घटना अंगविक्रीच्या धोक्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक जबरदस्त उदाहरण ठरते.