Shocking video: चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. या महापुरामुळे संपूर्ण प्रांतात भू-स्खलन, रस्ते व पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चीनच्या सिचुआन प्रांतात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला. तिथे मडफ्लो अर्थात चिखलयुक्त भूस्खलनने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर सध्या याचाच एक भयावह व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये अवघ्या ४७ सेकंदात एक पूर्ण गाव पाण्याच्या लाटांमध्ये गायब होताना दिसत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुराच्या पाण्यात बघता बघता संपूर्ण गाव वाहून गेलं आहे. घरं उध्वस्थ होताना दिसत आहे. आणि हे केवळ ४७ सेकंदात घडलं आहे. पाण्याचा प्रवाह इतका आहे की यापुढे कुणीच टिकू शकत नाही.
या पूरस्थितीमुळे अनेक भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या आणि डोंगर उतारावरील गावांमध्ये पाणी शिरलं असून अनेक कुटुंबांना मध्यरात्री घर सोडावं लागलं. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर्स, ड्रोन आणि रबरी बोटींनी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढत असल्याने, यंदाच्या मॉन्सून हंगामातील चीनमधील गुइझोऊ प्रातं सर्वाधिक प्रभावित झाला आहे.
पाहा व्हिडीओ
तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला शेजारी असलेला चीन जबरदस्त पुढे निघून गेला आहे. नुकतंच याचे एक उदाहरण समोर आलं आहे. चीनमधील तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे की आता ते ड्रोनद्वारे आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.