Shocking video: भाजी किंवा डाळ करताना आपण आलं – लसणाची पेस्ट वापरतो आलं – लसणाच्या पेस्टमुळे पदार्थाची रंगत वाढते, आणि पदार्थ चविष्ट होतो. पण आलं – लसणाच्या पेस्टमध्ये प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण जास्त असते. जे आरोग्यासाठी घातक असते. अशात तुम्ही ही पेस्ट बाहेरुन विकत घेत असाल तर आत्ताच थांबा. आलं आणि लसूण या दोन्ही पदार्थात अँटीइन्फ्लेमेटरी तत्व असतात. यामुळे हृदयरोगी व्यक्तींनाही फायदा मिळतो. याशिवाय आलं-लसणात अँटीकॅन्सर गुण असतात. प्रतिकारशक्ती वाढण्याची योग्य क्षमता यामध्ये असते. हीच पेस्ट अनेकजण घरात तयार न करता बाहेरून तयार स्वरुपाची घेऊन येतात. तुम्हीही विकतची आले लसूण पेस्ट वापरत असाल तर हा व्हिडीओ पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढविण्यासाठीचा आवश्यक आणि महत्वाचा जिन्नस होय. आलं, लसूण न वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. झणझणीत, रस्सेदार ग्रेव्ही करायच्या म्हटल्या की त्यात आलं – लसूण पाहिजेच. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं – लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते. एखाद्या दिवशी आलं – लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिजे तशी चवच येत नाही. परंतु अनेक वेळा धावपळीत आले लसूण सोलून त्याची पेस्ट बनवायला वेळ नसतो. त्यामुळे महिला विकतची पेस्ट आणतात आणि वापरतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही पेस्ट कशी बनवली जाते. नाही ना…मग हा व्हिडीओ बघून यापुढे आले-लसूण पेस्ट विकत घेताना शंभर वेळा विचार कराल.

कारण या फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक चक्क पायानं आणि गटाराच्या पाण्यानं आलं लसूण पेस्ट तयार करत आहेत. जेवणामध्ये चव येण्यासाठी जी आलं लसूण पेस्ट आपण आवर्जून वापरतो तीच पेस्ट कशी तयार केली जाते हे पाहून सर्वानाच धक्का बसलाय. हा व्हिडीओ हैदराबादमधल्या एका फॅक्टरीमधला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या फॅक्टरीमध्ये किती अस्वच्छता दिसत आहे.  हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ reporter_mahboob नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी प्रचंड संतापले असून कारवाईची मागणी करत आहेत. तसेच फॅक्टरी लवकरात लवकर बंद करण्याचीही मागणी होत आहे. एकानं म्हंटलंय, “बापरे जीव घेणार का आता?” तर आणखी एकानं अतिशय चिंताजनक आहे हे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video making ginger garlic paste in factory manufacturing in unhygienic manner video goes viral on social media srk