Snake Viral Video: सोशल मीडियावर सापांचे व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. काही रोमांचक असतात तर काही भयावह असतात. अलिकडचा एक व्हिडिओ इतका भयानक आहे की पाहणारे थक्क झाले. साप किती धोकादायक असतात, हे लोक अजूनही समजून घेत नाहीत! विषारी सापांचा एक दंश मृत्यूचे कारण ठरू शकतो हे माहित असूनही काही लोक स्टंटबाजी करतात किंवा सापांना त्रास देतात. सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो तरीही लोक सुधारत नाही. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये, एक माणूस अक्षरश: सापाच्या फण्यावर पाय ठेवून उभा राहतो आणि त्यानंतर काय होते ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस सापाच्या फण्यावर पाय ठेवून उभा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यावेळी जवळचे लोकही त्याला प्रोत्साहन देत आहेत. पण, काही क्षणातच संपूर्ण दृश्य बदलते. सुरुवातीला, साप काही सेकंदांसाठी स्थिर राहतो, परंतु अचानक तो जोरात फिरतो आणि त्याच्या संपूर्ण पायाभोवती गुंडाळतो. काही क्षणातच, साप त्या माणसाच्या पायाला घट्ट पकडतो. हे दृश्य इतके भयानक आहे की पाहूनच अंगावर काटा येतो. तो माणूस सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करू लागतो.खूप प्रयत्नांनंतर आणि जमिनीवर पडल्यानंतर, त्याची सापाच्या तावडीतून स्वतःची सुटका होते.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DPSoz22DNbz/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर prem_kumar5784 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कोणीतरी लिहिले की, “सापाशी खेळण्याची ही शिक्षा आहे.” ” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “हा माणूस स्वतःच्या जीवाशी खेळत होता.” दरम्यान, अनेकांनी असे धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करण्याविरुद्ध इशारा दिला कारण ते प्राणघातक ठरू शकतात. हा व्हिडिओ आणखी एक आठवण करून देतो की सापांसारख्या विषारी प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे शहाणपणाचे आहे. ते क्षणार्धात हल्ला करू शकतात आणि एकच चावा जीवघेणा ठरू शकतो. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि इंटरनेटवर तो सतत शेअर केला जात आहे. भयानक स्वरूप असूनही, तो चर्चेचा विषय बनला आहे.