Shocking video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच राजस्थानमधील झुंझुनू येथून एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
मुसळधार पावसात एक डोंगर पत्त्यांच्या ढिगासारखा जमिनीवर कोसळला. या व्हिडिओमुळे जवळपासच्या स्थानिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . ते त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त करत आहेत. काही सेकंदातच डोंगराळ भाग कोसळून जमिनीवर भयानक स्फोट झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये फक्त २८ सेकंदात संपूर्ण डोंगर कसा कोसळला हे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, जेव्हा डोंगर कोसळला तेव्हा खूप मोठा आवाज ऐकू आला. डोंगर कोसळण्याचा हा व्हिडिओ स्थानिक लोकांनी देखील शूट केला आहे. स्थानिकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे कारण त्यांना संशय आहे की बेकायदेशीर खाणकाम हे देखील डोंगर कोसळण्याचे एक कारण असू शकते.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ @sarviind ने एक्स वर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “टेकडी पत्त्यांच्या डेकसारखी विखुरली आहे. हृदयद्रावक. सामान्य माणसाच्या लोभाचे परिणाम. हा व्हिडिओ चिदावा (झुंझुनू) येथील असल्याचे सांगितले जात आहे.”
नेटकरी पर्वत कोसळण्यासाठी बेकायदेशीर मानवी आक्रमणाला जबाबदार धरत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “जोपर्यंत मनुष्य त्यांच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान करत राहतील… तोपर्यंत एक दिवस निसर्ग स्वतःच सर्वांचा नाश करेल.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “आपण आपल्या डोळ्यांसमोर पर्यावरणाचे सौंदर्य पत्त्यांच्या घरासारखे कोसळताना पाहत आहोत, आणि मानवांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे.”