Shocking Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर इतके भयानक असतात की पाहून धक्का बसतो.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला भयानक दृश्य दिसेल. दोन वर्षाच्या मुलीसह वडील चक्क बंजी जंपिंग करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या चिमुकलीला घेऊन वडिलांनी पूलावरून २०० फूट खोल दरीत उडी मारली. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. बापाचं धाडस की मूर्खपणा अशा आशयाचे मेसेज या व्हिडीओ वर नेटकरी करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ मलेशिया येथील आहे. रिअॅलिटी स्टार रेडा रोझलान (Redha Rozlan) त्याच्या २ वर्षाच्या मुलगी मक्का मिकेलासोबत (Mecca Mikaela) २०० फूट खोल दरीत बंजी जंपिंग करताना दिसत आहे. त्यांनी सेफ्टी हार्नेस घातले होते, असा दावा केला आहे पण हेल्मेट नसल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी त्याच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

viral.in.india_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “मुर्खपणा. काही पालक मुलांसाठी योग्य नाही. काळजी नसणाऱ्या वडिलांनी बंजी जंपिंग करताना त्याच्या २ वर्षाच्या मुलीला धरून २०० फूट उडी मारली”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुलाच्या अंगावर सेफ्टी हार्नेस नाही का? किमान वयाची अट नाही का?” तर एका युजरने लिहिलेय, “मला पाहून एन्झायटी आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “याच्यावर गुन्हा दाखल करा. ” एक युजर लिहितो, “हे पाहून खूप वाईट वाटले, तू वडील आहेस म्हणून तिचा जीव धोक्यात घालू शकतो, असे समजू नकोस.” तर दुसरा युजर लिहितो,”व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून जोरदार टीका करत संताप व्यक्त केला आहे.