Shocking video: बऱ्याचदा आपण भूक किंवा तहान लागली की पटकन ज्यूस घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस हे आपल्याला आरोग्यासाठी चांगले वाटत असले तरी ते प्रत्यक्षात तसे असतील याची खात्री नाही. पैसे वाचवण्याच्या नादात आपल्या आरोग्याशी प्रतारणा करू नका.तुम्ही जर डबाबंद ज्यूस पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डबाबंद ज्यूस म्हणजे रियल फ्रूट असा जर तुमचा समज असेल, तर ही बातमी आवर्जून पाहा. तुम्ही डोळे झाकून बाजारातून डबाबंद ज्यूस विकत घेता मात्र तुम्हाला माहितीये का ते कसे तयार होतात? एका मोठ्या ज्यूस फॅक्टरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरातील अनेक पॅकेट किंवा बॉटलमध्ये ज्यूस विकणाऱ्या कंपन्या आपल्या जाहिरातींमध्ये हे ज्यूस कसे हेल्दी असतात याबाबत सांगतात. फ्रेश ज्यूस तयार करण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून लोक हे पॅकेटमधील ज्यूसचं पितात. या ज्यूसमध्ये असे अनेक प्रिजर्वेटिव्स असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. अशात एका मोठ्या ज्यूस फॅक्टरीचा व्हिडीओल व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.

सध्या जिकडे पाहावं तिकडे पॅकफूडची मागणी वाढतीय. सुपरमार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबाबंद ज्यूस पाहायला मिळतायेत. रियल फ्रूट जूस, एनर्जी ड्रिंक्स, हेल्थ ड्रिंक्स, शुगर फ्री अशा नावानं प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनांची जाहिरात करतीये..मात्र हे डबाबंद ज्यूस आरोग्यासाठी खरचं हेल्दी आहेत का? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे बेरीजचा ज्यूस बनवला जात आहे. अचानक लोकांची नजर सापावर पडते. फॅक्टरीचा कर्मचारी मोठ्या मुश्किलनं या सापाला मशीनच्या क्रशरमध्ये जाण्यापासून रोखतो. जर असं केलं नसतं की, सापही त्यात चिरडला गेला असता आणि ज्यूसमध्ये मिक्स झाला असता.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर nafeesjadoon59 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बहुतांश रियल फ्रूट जूसध्ये साखरेचा घोळ आणि फळांची चव येण्यासाठी फ्लेव्हर मिक्स केले जातात. बरेच जण हेल्दी राहण्यासाठी असे डब्बाबंद ज्यूस घेतात. रुग्णांनाही आपण हेच ज्यूस देतो. त्यामुळे याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video snake seen in churning machine juice making factory srk