Viral video: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. सध्या असाच एक पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोपट हा जगातील एकमेव असा पक्षी आहे; जो मानवी आवाजांचे हुबेहूब अनुकरण करू शकतो. जो माणसासारखे बोलू शकतो. एखाद्या व्यक्तीने तोंडून उच्चारलेले शब्द ऐकून तो ते पुन्हा म्हणू शकतो. जगातील कोणताही प्राणी किंवा पक्षी असे करू शकत नाही. याच पोपटानं अशी कमाल केलीय की पाहून तुम्हीही कराल कौतुक..तर झालं असं की, चोरी कारायला शिरताच चोरासोबत पोपटाने असे काही केले की त्याने धूम ठोकली आहे.

असे म्हणतात कुत्रा हा सगळ्यात ईमानदार प्राणी असतो. मालकावर कोणतेही संकट आले की तो त्याला वाचवण्यासाठी काहीही करतो. पण इथे काही वेगळे घडले आहे. एका पोपटामुळे चोरी टळली आहे. होय एका पोपटामुळे…या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चोर गुपचूक एका घरात खिडकीतून शिरण्याचा प्रयत्न करत होता. तो शिरत असलेल्या रुममध्ये कोणतीही व्यक्ती नव्हती, यामुळे चोर सहज आत आला. पण तिथेच एका कोपऱ्यात एका फांदीवर पोपट बसला होता. कोणला तरी घुसताना पाहताच पोपटाने चोर, चोर म्हणत आरडा-ओरडा सुरु केला. त्याचा आवाज ऐकताच चोराने तिथून धूम ठोकली. याच वेळी एक महिला देखील तिथे आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोपटांची जीभ जाड असते; जी त्यांना आवाजाचे अनुकरण करण्यास मदत करते. पोपट विशेषतः मानवी शब्द आणि आवाजांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. उदाहरणार्थ- पोपट “हॅलो, कसे आहात?” असे सहज म्हणू शकतो. असे असले तरी पोपटांना माणसाप्रमाणे समज नसते किंवा माणूस काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते; परंतु तुम्ही ज्या गोष्टी रोज वारंवार बोलता, त्या ऐकलेल्या गोष्टी पुन्हा त्याच पद्धतीने उच्चारण्यात पोपट खूप पटाईत असतात.

पाहा व्हिडीओ

@Digital_khan01 या एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, प्रत्येकाला अशा रक्षकाची गरज असते जो आपल्याला पूर्ण सुरक्षा देऊ शकेल आणि आपल्याला शांत झोपू देईल. तर अनेकांनी या पोपटाचं कौतुक केलंय.