Shocking video: वाघाला, सिंहाला पाहायला कुणाला आवडणार नाही. त्यासाठी आपण जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये जातो. पण सिंह तो सिंह… जो जंगलाचा राजा. कितीही पाहावासा वाटला तरी त्याला पाहताच आपल्याला धडकी भरतेच. सिंह समोर आला की हृदयाचे ठोके वाढतात. सिंह दिसला म्हणून कुणीही त्याच्या अगदी जवळ जाणार नाही. पण एका व्यक्तीने अशी नको ती डेअरिंग केली.
सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. यामुळेच या धोकादायक प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करूनही लोक त्यांच्याजवळ जाण्यास टाळाटाळ करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने यूजर्सला धक्का बसला आहे. यामध्ये एका व्यक्तीला सिंहासमोर धाडस दाखवणं महागात पडलंय.
ही घटना गुजरातमधील आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये एक तरुण सिंहाजवळ त्याच्या शिकारीचा व्हिडिओ आणि फोटो काढायला गेला होता, परंतु त्याच्या या कृत्यावर जंगलाचा राजा सिंह चांगलाच भडकला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिरवागार जंगलाचा घनदाट परिसर दिसत आहे. येथेच एक सिंह आपल्या शिकारीचा आनंद लुटत आहे. याच वेळी एक तरुण याचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्या सिंहाजवळ जातो. तरुणाला पाहताच सिंह त्याच्या दिशेने धाव घेतो. यामुळे तरुणाला उलटे माघारी परतावे लागते. सुदैवानं सिंहाने तरुणावर हल्ला केलेला नाही, परंतु जर सिंहाने हल्ला केला असता तर यामुळे त्याचा जीवही गेला असता.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Mariyam_MBD नावाच्या युजरने एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे, यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, कशाला जीवाशी खेळता? तर आणखी एकानं, चांगलीच अद्दल घडली अशी प्रतिक्रिया दिली आहे.