Shocking video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. यामुळेच या धोकादायक प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करूनही लोक त्यांच्याजवळ जाण्यास टाळाटाळ करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यामध्ये एका व्यक्तीला सिंहाला डिवचणं चांगलंच महागात पडलंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण पिंजऱ्यात बंद असलेल्या सिंहाला विनाकारण त्रास देत आहे. पिंजऱ्यात हात घालून सिंहाला डिवचताना दिसत आहे. यावेळी सिंहाला राग येत असून तो तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरीही हा तरुण मागे हटत नाहीये तर तसंच त्या सिंहाला त्रास देतोय. शेवटी सिंहाचा संयम तुटतो आणि या तरुणाच्या हातावर सिंह जोरात हल्ला करतो. पिंजऱ्यात असूनही सिंहानं या तरुणावर असा हल्ला केला की, एका पंजातच या तरुणाच्या हाताची नस फाटते. अशाप्रकारे सिंहाला विनाकारण त्रास देणं या तरुणाला चांगलंच महागात पडलंय.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DLmmxL8T3di/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ tanveershikalgar नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, “वाघ,सिंह हे जंगलात राहणारे प्राणी आहेत. त्यांना अशाप्रकारे बेड्या ठोकून ठेवणे योग्य नाही.” आणखी एका युजरने लिहिले की, “सिंह हा पाळीव प्राणी नाही… या लोकांवर कोणत्याही क्षणी आपत्ती येऊ शकते.”तिसऱ्या युजरने लिहिले, “नको तिथे शहानपणा केला की असं होतं” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.