Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये झालं असं की चिमुकला खेळताना वॉशिंग मशीनमध्ये गेला,दुसऱ्याने प्लग सुरू केला, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही. यामुळे ते अनेकदा चुकीच्या गोष्टींसोबत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत सापडतात. थोड्यावेळासाठी पालकांचं लक्ष दुसरीकडे गेलं तरी हे चिमुकले काहीतरी कारनामा करतात. मात्र कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेततं. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक चिमुकला वॉशिंगमशीनमध्ये जाऊन अडकला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन चिमुकली घरातील अंगणात खेळताना दिसत आहे.त्याच वेळी घराच्या बाहेर ठेवलेल्या वॉशिंग मशीन तुम्हाला दिसेल त्यातील एक चिमुकला वॉशिंग मशीनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. अनेक वेळ केलेल्या धडपडीनंतर तो चिमुकला वॉशिंग मशीनच्या आतमध्ये जातो. धक्कादायक गोष्ट म्हणजे आतमध्ये घुसल्यानंतर पुढच्याच क्षणी बाहेर असलेला चिमुकला वॉशिंग मशीनचे स्विच चालू करतो आणि मशीन चालूही होते. मशीन चालू झाल्यानंतर चिमकुला अत्यंत खुष झालेला दिसून येतो.मात्र हे अत्यंत जीवघेणे ठरु शकते.व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला दिसेल की घरातील कोणत्याही सदस्याने चिमुकल्यांकडे पाहिले नाही

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ yoo__bros नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या पालकांवर संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking viral video of child dangerous play with washing machine goes viral people are in shock srk