Snake frozen inside ice cream:आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेवरमध्ये आईस्क्रीम तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपल्या मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागेल. फोटो पाहून तुम्हीही आईस्क्रीम खाताना शंभर वेळा विचार कराल.थायलंडमध्ये एका माणसाला त्याच्या आईस्क्रीममध्ये एक मृत, गोठलेला साप सापडला. त्याने आईस्क्रीममध्ये निर्जीवपणे मेलेल्या सापाचे फोटो शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थायलंडच्या मुआंग रत्चाबुरी प्रदेशातील ‘रायबान नाकलेंगबून’ नावाच्या एका माणसाने स्वतःसाठी ब्लॅक बीन आईस्क्रीम घेतली. यावेळी त्याने आईस्क्रिम उघडताच त्याला धक्का बसला. आईस्क्रिममध्ये गोठलेल्या अवस्थेत हा साप होता. त्याने तो एक विषारी साप असल्याचे सांगितले. फोटोंमध्ये आइस्क्रीममध्ये एक काळा आणि पिवळा साप दाबलेला दिसत होता. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि काहीच वेळात सर्वत्र व्हायरल झाले. नकलेंगबूनने थाईमध्ये लिहून फोटो शेअर केला. फोटोसोबत लिहिले की एवढे मोठे डोळे! हा साप खरच मेला आहे का, ब्लॅक बीन रस्त्यावरचा विक्रेता, हा खरा फोटो आहे, कारण मी स्वतः विकत घेतलेल्या आईस्क्रीमचा हा फोटो आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर लोक म्हणतात की, हा एक सौम्य विषारी गोल्डन ट्री स्नेक आहे. जो सामान्यतः थायलंडमध्ये आढळतो.जर आपण या सापाच्या लांबीबद्दल बोललो तर तो ७० ते १३० सेंटीमीटर लांब आहे, परंतु आईस्क्रीममध्ये आढळणारा हा साप खूपच लहान आहे, ज्याची लांबी २० ते ४० सेंटीमीटर आहे.

पाहा फोटोस

https://twitter.com/Abhishe9681622/status/1898391135132811467

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सोशल मीडियावर या घटनेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांनी याला “प्रोटीन बूस्ट” असे संबोधून त्याची खिल्ली उडवली, तर काहींनी तिरस्कार आणि भीती व्यक्त केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake frozen inside ice cream thai man spots dead snake frozen inside his ice cream bar shares visuals on facebook srk