King Cobra Viral Video : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील किंग कोब्रा ही प्रजात विषारी आणि महाकाय शरीरासाठी ओळखली जाते. या सापाच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून केवळ माणूसच नाही, तर अनेक प्राणीदेखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महाकाय किंग कोब्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यातून भले भले घाबरतील अशी किंग कोब्राची लांबी दिसतेय.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महाकाय किंग कोब्रा एका झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर चढताना दिसत आहे. झाडावर चढताच तो फणा पसरवून डुलताना दिसतोय. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की, किंग कोब्रा एका दाट हिरव्यागार झाडाच्या एका उंच फांदीवर अतिशय शांतपणे धोकादायक स्थितीत बसला आहे. त्याची लांबी आणि त्याच्या फण्याचा आकार पाहून कोणालाही भीती वाटेल. सहसा साप जमिनीवर सरपटताना दिसतो. पण हा किंग कोब्रा ज्या पद्धतीने एका उंच झाडावर पोहोचला आहे, ते फार असामान्य आणि आश्चर्यकारक आहे. हे दृश्य पाहतानाही फारच भयावह वाटते.

किंग कोब्राचा हा भयानक व्हिडीओ mahesh_salve__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, झाडाच्या वर इतका मोठा साप कधीच पाहिला नाही. भयानक आणि आश्चर्यकारक. दुसऱ्याने कमेंट केली की, हे दृश्य नॅशनल जिओग्राफिकमध्येही क्वचितच दिसते.

तज्ज्ञांच्या मते, किंग कोब्रा त्याच्या लांबी व ताकदीसाठी ओळखला जातो. हा जगातील सर्वांत लांब विषारी साप आहे, ज्याची लांबी १८ फुटांपर्यंत जाऊ शकते. सहसा त्याला जमिनीवर राहायला आवडते; परंतु धोक्याच्या वेळी किंवा भक्ष्याच्या शोधात तो झाडावर चढू शकतो.

किंग कोब्राचा भयावह व्हिडीओ

उंच झाडावर बसून फणा पसरवणे हे केवळ धोक्याचे संकेत नाहीत, तर ती किंग कोब्राची त्या प्रदेशात असलेल्या उपस्थितीची घोषणादेखील मानली जाते. काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जेव्हा साप सावध असतो किंवा त्याच्या प्रदेशाचे रक्षण करीत असतो तेव्हा तो अशा प्रकारचे वर्तन करतो. हा व्हायरल व्हिडीओ केवळ एक रोमांचक दृश्यच नाही, तर जंगलाच्या जगात लपलेल्या रहस्यांची आणि धोक्यांची झलकदेखील देतो.