सणांदरम्यान किंवा घरात एखादा खास कार्यक्रम असेल की लहान मुली, तरुणी, स्त्रिया आपल्या हातावर आवर्जून मेंदी काढून घेतात. मेंदीमुळे हाताची शोभा वाढते आणि सौंदर्यात आणखीन भर पडते. भारतात आणि परदेशातसुद्धा अनेकांना मेंदी काढून घेण्यास आवडते. तर याचसंबंधित सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक दक्षिण कोरियाचा रहिवासी भारतात आला आहे आणि त्याने हातावर आवडीने मेंदी काढून घेतली आहे. तसेच आपला अनुभव शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडीओत रस्त्यावर विविध वस्तू आणि पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तिथेच एक महिला मेंदी काढण्यासाठी स्टॉल लावून बसली आहे. भारतात फिरायला आलेला दक्षिण कोरियाचा रहिवासी त्या स्टॉलजवळ जातो. तसेच तो महिलेकडून मेंदी काढून घेतो. महिलेने दक्षिण कोरियाच्या तरुणाने हातावर अरेबिक मेंदीची सुंदर डिझाईन काढली आहे. तरुणाला महिलेने काढलेली मेंदी डिझाईन खूप आवडते, म्हणून तो सोशल मीडियावर हा अनुभव शेअर करताना दिसला आहे. दक्षिण कोरियाच्या रहिवाशाने हातावर कशाप्रकारे मेंदी काढली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
दक्षिण कोरियाचा रहिवासी हातावर काढून घेतोय अरेबिक मेंदी :
लग्नाच्याआधी काही दिवस मेंदी कार्यक्रम आयोजित केला जातो आणि नवरा-नवरीच्या हातावर मेंदी काढली जाते. तर भारताच्या अनेक चालीरीती, परंपरा, संस्कृती परदेशात अनेक जणांना आकर्षित करतात आणि परदेशातील लोकांना भारतात येऊन या गोष्टींचा अनुभव घ्यायला आवडतो. तसंच काहीसं या व्हिडीओतसुद्धा पहायला मिळालं. दक्षिण कोरियाचा रहिवासी भारतात येऊन हातावर आवडीने मेंदी काढून घेताना दिसला आहे आणि त्याने एक खास पोज देऊन व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. दक्षिण कोरियाच्या रहिवाशाने भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिली आहे आणि आपल्या अकाउंटवर व्हिडीओ शेअर केले आहेत. तर आज त्याने मेंदी काढण्याचा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pyarajakekodia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणाने स्वतः हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत तरुणाने हातावर मेंदी काढून घेतली आहे, हे पाहून काही जण त्याला ट्रोल करताना दिसले आहेत. तसेच दक्षिण कोरियन रहिवासी याच्या समर्थनात एका युजरने कमेंट करून लिहिलं की, “काही संस्कृतीमध्ये लग्नाच्या आधी पुरुषांच्या हातावर मेंदी काढली जाते आणि हे अगदीच सामान्य आहे.” तसेच अनेक जण “मेंदी तुझ्या हातावर शोभून दिसते आहे” अशी प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.