प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतात, जे प्रेक्षकांनाही पाहायला आवडतात. सध्या एका कुत्र्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल आणि स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही. खरं तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकासोबत माणसाप्रमाणेच दोन पायांवर चालताना दिसत आहे. डॉगी लव्हर्सना हा व्हिडीओ खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुढे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह आवरता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दृढ इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्न करण्याची तयारी असेल तर यशस्वी होण्यापासून माणसाला कोणीही रोखू शकत नाही. अर्थात ही गोष्ट केवळ माणसांसाठीच नव्हे तर प्राण्यांना देखील लागू पडते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. तुम्ही याआधी अनेकदा कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे व्हिडीओ बघितले असतील मात्र, माणसाप्रमाणेच दोन पायावर चालणार कुत्रा क्वचितच पाहिला असेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या कुत्र्यासोबत रस्त्याच्या कडेने जात आहे, परंतु, सर्वांच्या नजरा त्याच्यासोबत असलेल्या कुत्र्यावर खिळल्या आहेत. कारण हा कुत्रा कोणतीही सामान्य खेळ खेळत नाही किंवा त्याच्या मालकाच्या मागे जात नाही. मालकाप्रमाणेच तो कुत्रा सुद्धा आपल्या दोन पायांवर चालतोय. त्याचवेळी कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, जे पाहून आज सगळेच थक्क झाले आहेत.

आणखी वाचा : शहरातल्या लग्नासाठी गावाकडची माणसं आली, कारंजे पाहून त्यांनी काय केलं पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘कच्चा बदाम’ ट्रेंडिंग गाण्यावर महिलेचा जबरदस्त डान्स, ८ लाखांहून जास्त व्ह्यूज

या कुत्र्याची मानवी चाल करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या Animalvideosco पेजवरू शेअर करण्यात आलाय, जो आतापर्यंत ८१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. श्वानप्रेमीही या व्हिडीओला प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत.

प्रेक्षकही व्हिडीओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने सांगितले की, कुत्रा आपल्यासाठी सामान्य गोष्ट असल्याप्रमाणे चालत आहे, तर एका यूजरने सांगितले की कुत्र्याच्या आत एक अद्भुत कला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story viral video of dog started walking on two legs like humans rock the internet prp