गावाकडची माणसं तशी खूपच साधी भोळी माणसं…असं अनेकदा म्हटलं जातं. शहरी जीवनापासून त्यांचा दूर दूरचा संबंध असतो. शहर आपल्यासाठी नाही बुवा, असं ते विनोदाने म्हणत शहरापासून थोडं दूरावाच ठेवतात. पण कधी कधी शहरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी जाणं झालं की मात्र त्यावेळी त्यांची धांदल उडते. कधी कधी त्यांच्या हातून असे प्रसंग घडतात, जे पाहून हसू आवरणं देखील अवघड होऊन जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. लग्नाला आलेल्या या पाहुण्यांनी असे काही केले की सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपल पाहू शकतो शाही थाटात पार पडत असलेल्या एका लग्नसमारंभात गावाकडची मंडळी आलेली दिसत आहे. पगडी आणि धोती परिधान केलेले आजोबा आणि त्यांच्यासोबत आणखी काही जण या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. लग्नात सजावटीसाठी बाहेर लावण्यात आलेले कारंजे पाहून या गावाकडच्या पाहूण्यांनी याचा भलताच उपयोग केल. लग्नात जेवणापूर्वी या गावाकडच्या पाहूण्यांनी आपली प्लेट या कारंज्यातल्या पाण्याने धुतली. जेवण करण्यापूर्वी आपले ताट आणि चमचे या रंगीबेरंगी पाण्यात धुताना दिसत आहेत.

sharad pawar devendra fadnavis (1)
“..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”

व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक मजेदार ऑडिओ सुद्धा ऐकू येतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मजा येईल. जिथे एकीकडे लग्नात पाहुणे येतात अगदी ठसठशीत, टापटीपमध्ये, तर या गावाकडच्या पाहुण्यांच्या करामती पाहून लोक हसताना दिसतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नात जबरदस्त सजावट करण्यात आली आहे. ‘मॅरेज हॉल’मध्ये एका बाजूला मंडप आहे. दुसऱ्या बाजूला एक कारंजी आहे. इथे काही पाहुणे त्यांचं ताट आणि चमचे साफ करताना दिसतात. ही क्लिप पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की पाहुणे असे का करत आहेत. असं दिसतंय की जेवणाचे ताट कमी पडले होते, त्यानंतर पाहुणे स्वत: घाणेरडे ताट स्वच्छ करू लागले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘कच्चा बदाम’ ट्रेंडिंग गाण्यावर महिलेचा जबरदस्त डान्स, ८ लाखांहून जास्त व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रुग्णाला डॉक्टरांनी आधी इंजेक्शन दिलं मग मारहाण केली, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मजेशीर कमेंट्सचा अक्षरशः महापूर
असंही होऊ शकतं की, पाहुण्यांना ताटाची स्वच्छता आवडली नाही, यामुळे त्यांनी जेवण्यापूर्वी ताट हाताने धुण्यास सुरुवात केली आहे. हा २३ सेकंदांचा व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक देखील केलं आहे. या व्हिडीओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने गंमतीत लिहिले की, ‘हे लग्नात न बोलावलेले पाहुणे आहेत, त्यामुळे ते भांडी धुत आहेत असे दिसते.’