‘अन्न हे पूर्णब्रह्म!’ अतिशय भूक लागलेली असताना समोर चविष्ट पदार्थांनी भरलेलं ताट येत तेव्हा आपोआप आपल्या तोंडातून हे वाक्य निघत. आपल्या सगळ्यांची धावपळ कशासाठी सुरू आहे? या प्रश्नाच मनात येणार पहिलं उत्तर म्हणजे पोटासाठी. जर आपण पैसे कमावणार नाही तर मग खाणार काय? हाच प्रश्न मनात घेऊन हातावर पोट असणारे असंख्य लोक रोज कामासाठी घराबाहेर पडतात. पण प्रत्येकवेळी त्यांना पुरेसे पैसे कमावण्याची संधी मिळतेच अस नाही, अशावेळी अनेकांना उपाशी दिवस काढावे लागतात. असाच काहीसा प्रकार बूट पॉलिश करुन पैसे कमावणाऱ्या एका मुलाबरोबर घडत असल्याचे स्ट्रीटफूड विक्रेत्याला समजताच त्याने काय केले पाहा.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक स्ट्रीटफूड विक्रेता बूट पॉलिश करून पैसे कमावणाऱ्या मुलाची मदत करत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये ते मुलाला ‘पैसे कसे कमवतोस, रोज पुरेसे पैसे मिळतात का?’ असे विचारतात. त्यावर तो उत्तर देत सांगतो फिरून बूट पॉलिश करून पैसे कमावतो. त्यावर स्ट्रीटफूड विक्रेता त्याला सांगतात, “कधी पुरेसे पैसे मिळाले नाहीत तर इथे येत जा, मी तुला जेवण देईन.” या विक्रेत्याच्या मदत करण्याच्या या भावनेने असंख्य मन जिंकली आहेत. पाहा हा व्हायरल होणारा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ :
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘फूडबाऊल्स’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, या स्ट्रीटफूड विक्रेत्याच्या मदत करण्याच्या भावनेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे