प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आपलं एक घर असावे. पण आजच्या काळात हे स्वप्न पूर्ण करणे अत्यंत अवघड झाले करण घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक छोटसा का असेना पण छोटा प्लॅट किंवा रुम भाड्याने घेतात. भाड्याने खोली घेणे देखील वाटते तितके सोपे नाही कारण पुणे, मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये छोट्याशा खोलीची किंमत खूप जास्त असतात. अनेक लोक आपल्या बजेटमध्ये एखादी रुम किंवा प्लॅट भाड्याने घेण्यासाठी संघर्ष करत असतात एका तरुणाला फक्त १५ रुपये भाड्याने एक रुम मिळाली आहे. होय तुम्ही योग्य तेच वाचत आहात…फक्त १५ रुपये! आजच्या काळात १५ रुपयांना रुम भाड्याने कशी काय मिळू शकते आणि कुठे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलm होय ना? चला तर मग जाणून घेऊ या नेमकं काय आहे प्रकरण?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाची पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण चक्क १५ रुपये भाड्याच्या खोलीमध्ये राहतो असा दावा करतो आहे.. त्याने आपल्या रुमचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मनीष अमन हा पश्चिम बंगाल येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स कल्याणी), एमबीबीएसच्या अंतिम वर्षामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. त्याने कॅम्पसमध्ये किती भाडे उघड केल्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केवळ १५ रुपये दरमहा बाथरुमसह मिळाली आहे.

अमनने X वर त्याच्या खोलीचे फोटो पोस्ट केले आणि स्पष्ट केले की,”त्याच्या कॉलेजने त्याला मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात राहण्याची सोय केली आहे. साध्या खोलीत सिंगल बेड, स्टडी टेबल आणि बाथरूम आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “मला बाथरुम असलेली ही सिंगल रूम दरमहा ₹१५मध्ये मिळाली आहे.”

हेही वाचा –मुंबईच्या रस्त्यावर बाईकस्वाराने केली शिवीगाळ, लहान मुलाबरोबर असलेल्या कारचालकाने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

काही एक्स वापरकर्ते दाव्याबद्दल साशंक होते, तर इतरांनी अमनला शुभेच्छा दिल्या. एका X वापरकर्त्याने कमेंट केली, “गुडगाव किंवा मुंबईमध्ये याची किंमत १२ हजार रुपयांपेक्षा एक रुपया कमी घेत नाही.” दुसऱ्या वापरकर्त्याने उपहात्माकपणे म्हटले, “मला अशीच एक खोली(जेल) मोफत मिळाली होती जेव्हा मला अटक करण्यात आली.”

“मुंबईमध्ये, १५ रुपयांना क्रीम पाव मिळेल, खोली नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले. एका यूजरने कमेंट केली, “१५ रुपये महिन्याला? अशा प्रकारच्या भाड्यासाठी तुम्ही ७० च्या दशकात परत गेला असाल.”

इतके कमी भाडे कसे शक्य आहे असे विचारले असता, अमन म्हणाला, “ते ५.५ वर्षांसाठी ५,८५६ रुपये घेतात, त्यापैकी १५०० रुपये परत केले जातात.”

एका वेगळ्या ट्विटमध्ये, त्याने त्याच्या कॉलेजच्या फिबद्दल अधिक तपशील देखील शेअर केला. त्याने सांगितले की, “लोक मला दरमहा ₹१५ मध्ये ही खोली कशी मिळाली हे विचारत आहे. सर्व गोष्टींसह माझ्या कॉलेजची एकूण फी ₹४,३५६ आहे तेबी ५.५ वर्षांसाठी. हे पैसे भरल्यानंतर एक रुपया भरावा लागणार नाही.”

ही कथा सप्टेंबरमध्ये एम्स देवघरच्या व्हायरल झालेल्या बातमीसारखीच आहे. त्या व्हिडिओमध्ये, एका MBBS विद्यार्थ्याने सांगितले आहे की, तो वसतिगृहाच्या खोलीसाठी दरमहा फक्त १५ रुपये कसे देतो, ज्यामध्ये बेड, स्टडी टेबल, खुर्ची आणि कपाट यासारख्या मूलभूत फर्निचरचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student reveals his rent for room with attached washroom rs 15 viral video snk