सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो खूप चर्चेत आला आहे. या फोटोत एक तरुण मोटारसायकलवर बसलेला दिसून येतोय. विशेष बाब म्हणजे तो ज्या बाईकवर बसला आहे त्याच्या बाईकवर लावण्यात आलेल्या नंबर प्लेटवर वाहनाच्या नंबरऐवजी ‘Grandson Of Nagercoil MLA MR Gandhi’ (नागरकोइलचे आमदार एमआर गांधी यांचा नातू) असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की, तो तरुण खरोखरच आमदार एमआर गांधींचा नातू आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआर गांधी हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोइल मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. गेल्या वर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत AIADMK सोबत युती करणाऱ्या भाजपने ४ जागा जिंकल्या होत्या. या आमदारांमध्ये विशेषत: पहिल्यांदाच भाजपचे ७६ वर्षीय ज्येष्ठ नेते एमआर गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एमआर गांधी यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांना सलग ६ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयाची चव चाखली. ते सध्या नागरकोइलोमधून निवडणूक लढवत आहे.

एमआर गांधी हे साधेपणाचे प्रतीक मानले जातात. ते नेहमी परंपरेनुसार खादर झिप्पा आणि वेट्टी घालतात. त्यांनी कधीही लग्न केले नाही. तो अनवाणीच विधानसभेत जातात. अशा स्थितीत स्वत:ला नातवंड म्हणवून घेणारा हा तरुण आपल्या दुचाकीवरून शहरात चर्चेचा विषय बनला आहे. त्याने असे का केले असा प्रश्न लोकांना पडतो.

आणखी वाचा : Viral Video : शर्यतीच्या सुरूवातीलाच पडला, पण शेवटी त्याने जे केलं ते पाहून तुम्ही म्हणाल “वाह, क्या बात!”

कोण आहे हा तरुण?
अनेक वर्षांपासून एमआर गांधींची गाडी ‘कन्नन’ नावाची व्यक्ती चालवत होती. कन्नन आणि त्यांचे कुटुंब आमदार होण्यापूर्वी एमआर गांधी यांच्या खूप जवळचे होते. कन्नन हा पूर्वीचा ड्रायव्हर आता एमआर गांधींचा जवळचा सहकारी आहे. हा तरुण कन्ननचा मुलगा असून अमरीश असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. अमरीश गांधींना खूप मान देतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच त्याने हे कृत्य केले.

आणखी वाचा : शिक्षक म्हणाले, “गाणं ऐकवा”, मग विद्यार्थ्यांनी जे केले त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा VIRAL VIDEO

बाईकवर क्रमांकाऐवजी ‘एमआर गांधी’ यांचे नाव वापरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत, फोटो पाहणारे अनेक नेटिझन्स मीम्सच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करत आहेत आणि त्याच्या पोस्टला बेकायदेशीर ठरवत आहेत. मात्र, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अविवाहित आमदार एमआर गांधी यांचे कन्नन आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जवळचे नाते आहे. अखेरीस भाजप सदस्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, अमरीशने आपल्या बाईकवर हे वाक्य प्रेमाची निशाणी म्हणून लिहिले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu man under fire for grandson of mla written on bike number plates prp