Besharam rang song recreation viral video: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांच्या बेशरम रंग गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दीपिकाचा असा बोल्ड अंदाज तु्म्ही याआधी कधी पाहिला नसेल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गाण्याचं वेड तरुणांना लागलेलं दिसतंय. कारण एका तरुणीने बेशरम रंग या गाण्याचं रिक्रिएशन करुन बोल्ड अंदाजात डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायरा नावाच्या एका मुलीनं बेशरम रंग गाण्याचं लिप्सिंग करुन भन्नाट ठुमके लगावल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दीपिका पादुकोण बेशरम रंग गाण्यावर जबरदस्त डान्स करताना टीव्हीत दिसते. त्याचवेळी ती तरुणीही दीपिकाने केलेल्या स्टेप्स फॉलो करत डान्स करण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. या तरुणीचा व्हिडीओत बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एक नेटकरी म्हणाला, “हे खूप महान आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “या तरुणीसमोर दीपिका फेल”. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली असून हर्ट आणि लव्हचे इमोजीही पाठवले आहेत.

नक्की वाचा – Video: भर लग्नमंडपात नवरीसोबत नवऱ्याने केलं असं काही….; नवरी चक्क स्टेजवरच पडली, नेमकं काय घडलं?

इथे पाहा व्हिडीओ

दीपिका आणि शाहरुखची सिझलिंग केमेस्ट्री पाहून तमाम चाहत्यांच्या मनाला भूरळ पडली आहे. बेशरम सॉंग दिवसेंदिवस लोकप्रीय होत आहे. गाण्यात असलेला बोल्ड अंदाज पाहून काही तरुणींना याच गाण्यावर थिरकण्याचं वेड लागलं आहे. एका तरुणीने दीपिकाने केलेल्या दिलखेचक अदा जशाच्या तशा कॅमेरासमोर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणी दीपिकाच्या बेशरम रंग गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना या व्हिडीओत दिसत आहेत. तरुणीने बेशरम रंग या गाण्यावर रिक्रिएट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनं नेटकऱ्यांना आकर्षीत केलं असून भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही या व्हिडीओवर होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen girl recreate pathan movie besharam rang song bold dance viral video on instagram shahrukh khan deepika padukone latest news update nss