Viral Video: आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू जेव्हा नोकरी सोडण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक माणूस हा भावूक होतोच. कारण – तुमचे काम, तुमची मेहनत आणि नोकरीला दिलेला तो अनमोल वेळ आदी सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नोकरीच्या शेवटच्या दिवशी नवीन प्रवास सुरु करण्याचा आनंद तर असतोच पण, दुःखही तितकेच असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे एका बस चालकाने निवृत्तीच्या दिवशी त्याच्या बसला अगदीच भावनिक निरोप दिला आहे.

व्हिडीओ तामिळनाडूचा आहे. बस चालकाचा नोकरीचा शेवटचा दिवस असतो. सुरवातीला बस चालक स्टेअरिंवर डोकं टेकवतो. त्यानंतर बसमधून उतरतो आणि पायऱ्यांच्या पाया पडतो. नंतर बस समोर उभं राहून त्याला डोळेभरून पाहतो, बसला मिठी मारतो आणि हात जोडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एकदा पाहाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: “तुम्ही माझ्यावर मरता म्हणून पुढच्या वर्षी…” नॅशनल क्रिएटर्स अवार्ड्समध्ये मोदींची गॅरंटी; इन्फ्लुएन्सर ओरडू लागले…

व्हिडीओ नक्की बघा…

तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या या बस चालकाने बस सेवेसाठी त्याच्या आयुष्याची ३० वर्षे समर्पित केली. तसेच निवृत्तीच्या दिवशी त्याच्या बसला त्याने भावनिक निरोप दिला आहे. हे बस चालक ३० वर्षे दिवसरात्र प्रवाशाच्या सेवेत राहिले आणि आता त्याच कामातून निवृत्ती घेणं म्हणजे बस चालकांसाठी हा क्षण भावनिक आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रामाणिकपणे काम करून आज निवृत्तीच्या दिवशी त्यांनी बसच्या पायऱ्यांच्या पाया पडत तर बसला मिठी मारत अनोखा निरोप दिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachkadwahai’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावुक झाले आहेत आणि ‘हीच भारतीय संस्कृती आहे’ ; असे आवर्जून म्हणताना दिसत आहे. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच मन जिंकून घेतलं आहे.