कॉलेज, ऑफिस यादरम्यान अनेकदा आपल्याला लहानपणीचे जुने दिवस आठवतात; जे आपल्याला नकळत आनंद देऊन जातात. लहानपणी शाळेत जाताना किंवा उन्हाळ्याच्या सुटीत मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना आवडत्या दुकानात जाऊन आपण चॉकलेट विकत घ्यायचो. या चॉकलेटची चव आणि नावेसुद्धा अगदीच सगळ्यांना तोंडपाठ आहेत. हाजमोला, आमचसका, जलजिरा, मँगो बाईट, बोरकूट यांसारखी अनेक चॉकलेट्स तुम्ही नक्कीच खाल्ली असतील. पण, आता ही चॉकलेट्स सहसा कोणत्या दुकानात मिळत नाहीत. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक व्यक्ती ही प्रसिद्ध चॉकलेट्स विकताना दिसून आली आहे.

व्हायरल व्हिडीओ कोलकाताचा आहे. येथील रस्त्यावर एक विक्रेता हातगाडीवर चॉकलेट्स विकताना दिसतो आहे. त्यांचे नाव मोहमिन असे आहे. त्यांच्याकडे मिळणारी सर्व चॉकलेट्स ९० च्या दशकातील सगळ्यांच्या आवडीची चॉकलेट्स आहेत. विक्रेत्याच्या हातगाडीवर मॅजिक पॉप्स, फटाफट, आम पाचक, आमपोळी, चिंचेचे चॉकलेट, कँडी आदी अनेक प्रसिद्ध चॉकलेट्स तुम्हाला दिसून येतील. एक तरुणी या विक्रेत्याकडे जाते आणि ९० च्या दशकातील सर्व खास चॉकलेट्स डब्यातून काढून सगळ्यांना व्हिडीओत दाखवते; जी तुम्हाला पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातील.

हेही वाचा… “आई मला माफ कर…” कर्जाच्या बोजामुळे व्यावसायिकाची आत्महत्या, भावाला शेवटचा VIDEO कॉल करुन नदीत उडी मारली

व्हिडीओ नक्की बघा :

जुने ते सोने :

चॉकलेट्स विक्रेता २२ वर्षांपासून कोलकाताच्या या रस्त्यावर ही प्रसिद्ध चॉकलेट्स विकतो आहे. विक्रेता ९० च्या दशकातील चॉकलेट्स बनवण्यासाठी ओळखला जातो. विक्रेता स्वतः त्याच्या घरी आंबापोळी, चिंचेच चॉकलेट यांसारखी अनेक चॉकलेट्स घरी बनवतो आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून, ती विकण्यासाठी रस्त्यावर हातगाडी घेऊन उभा राहतो. तरुणीलासुद्धा ही चॉकलेट्स पाहून तिचे लहानपण आठवले आणि म्हणून या विक्रेत्याच्या आणि या प्रसिद्ध चॉकलेट्सचा हा व्हिडीओ बनवून तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आजकाल ही चॉकलेट्स दुकानात मिळणे खूप कठीण आहे. पण, आज या व्हिडीओतून पुन्हा एकदा ही चॉकलेट्स आपल्याला पाहायला मिळाली आणि लहानपणीच्या सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @meghadasgupta या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मेघा दासगुप्ता असे या युजरचे नाव असून, ती कन्टेन्ट क्रिएटर आहे. तसेच युजरने चॉकलेट्स विक्रेत्याची प्रशंसा केली आहे आणि विक्रेत्याचा पत्ता देखील तिने कॅप्शनमध्ये नमूद केला आहे. व्हिडीओ पाहून कोलकाताचे रहिवासी त्यांच्या आठवणी कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.