Viral post: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणतात, ज्यांना भेटायचे असते ते कसेही भेटतात.. या म्हणीचा अर्थ असा आहे की, लग्न ही दोन व्यक्तींमधील एक पवित्र आणि दैवी संबंध आहे, जे स्वर्गात आधीच ठरलेले असते. जरी त्यांनी आधी एकमेकांना नाकारले असेल किंवा दुर्लक्ष केले असेल तरी. ज्या लव्हस्टोरी पूर्ण व्हायच्या असतात, त्या होतातच. याचंच एक उदाहरण दाखवणारी भन्नाट लव्ह स पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
फ्रेंडशिप डे निमित्त शेअर केलेली फिल्मी लव्हस्टोरी
अशीच एक फिल्मी लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने एक्सवर ही स्टोरी शेअर केली आहे आणि सांगितले आहे की तिने तिच्या वर्गमित्राशी कसे लग्न केले ज्याला शाळेत असतना तिचा राग यायचा.त्या महिलेने फ्रेंडशिप डेच्या दिवशी तिची फिल्मी लव्हस्टोरी शेअर केली, जी व्हायरल होत आहे.
आंचल रावतने दोन फोटो शेअर केले – एक शाळेचा आणि दुसरा लग्नाचा, आणि सांगितले की तिला एक मुलगा होता जो शाळेत तिचा द्वेष करायचा. द्वेषामागील गोष्टही तिने शेअर केली आहे. आंचल म्हणते, मी अशा प्रकारची मुलगी होते जिला मुलांशी मैत्री करायची नव्हती. यावेळी एका लाजाळू मुलाने त्याचे जेवण माझ्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि मी चुकून त्याचा पोकेमॉन टिफिन बॉक्स तोडला,हाहाहा.. मला वाटतं मी त्या दिवशी त्याला जवळजवळ रडवलं होतं आणि त्यानंतर तो पुन्हा कधीच माझ्याशी बोलला नाही..ती पुढे म्हणाली, “१५ वर्षांनंतर, मी जीवनसाथी (एक विवाह अॅप) वर त्याच व्यक्तीला भेटले. त्याचा पहिला मेसेज फक्त असा होता की, ‘तू मला कधी नवीन टिफिन बॉक्स आणून देशील?'” “आम्ही शाळेत असताना कधी मित्र झालो नाही, पण आम्ही नक्कीच लग्न करू.” तिच्या पोस्टच्या शेवटी तिने हॅपी फ्रेंडशिप डे पती देव असे लिहिले. तिने तिच्या पोस्टचा शेवट हार्ट इमोजीने केला.
पाहा पोस्ट
आंचलची प्रेमकहाणी काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाली. तिची पोस्ट आतापर्यंत १० लाखांहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. २७ हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तिची पोस्ट लाईक केली आहे. वापरकर्त्यांनी पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वांनी त्यांच्या लव्ह स्टोरीचे खूप कौतुक केले आहे.