रेल्वेने प्रवास करताना अनेकदा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो, याचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. शिवाय रेल्वेच्या प्रवासादरम्यान लोक ट्रेनमधील शौचालयाचा त्याचवेळी वापर करतात, जेव्हा त्यांना खूप गरज असते. कारण इतर वेळी शौचालयात जायचं म्हटल तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. इतकी ती अस्वच्छ असतात. सध्या एका तरुणासोबत असाच प्रकार घडला आहे, ज्यामुळे रेल्वेतील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाय या तरुणाने या रेल्वेच्या शौचालयातील अस्वच्छतेवरुन थेट रेल्वे विभागाला टॅग करत ट्विट केलं आहे. जे पाहून अनेकांनी त्या व्यक्तीला गमतीशीर उत्तरं दिली आहेत. मात्र, रेल्वेने त्याच्या ट्विटची दखल घेतली आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीची तक्रार WHO आणि UN कडे नेण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी त्याच्या तक्रारीचं समर्थन करत रेल्वेत अशीच परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे.

हेही पाहा- तुटलेल्या हेल्मेटचा वापर करण्यासाठी केला अनोखा जुगाड, Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

तक्रारीनंतर रेल्वेने दिले उत्तर –

हेही पाहा- चोरट्यांनी बुटासह अंडरवेअरमध्ये लपवलं तब्बल १.४ कोटींच सोनं; व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

@ArunAru77446229 नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या गैरसोयीबद्दल रेल्वेला टॅग करत शौचालयात पाणी नसल्याची तक्रार केली. त्याने लिहिले, “आज मी पद्मावती एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना, ट्रेनमधील टॉयलेटमध्ये गेलो तेव्हा तिथे पाणी येत नव्हते. त्यामुळे मी परत माझ्या सीटवर येऊन बसलो. ट्रेन २ तास उशिराने धावत आहे. त्यानंतर रेल्वेने तक्रारदाराला त्याच्या प्रवासाचा तपशील विचारला आणि त्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या संबंधित विभागाला सूचना दिल्या. रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “गैरसोयीबद्दल क्षमस्व. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्यासोबत प्रवासाचे तपशील (PNR/UTS नंबर) आणि मोबाइल नंबर वैकल्पिकरित्या DM द्वारे पाठवा. तुम्ही तुमची तक्रार थेट https://railmadad.indianrailways.gov.in वर देखील पाठवू शकता.” रेल्वेचे उत्तर आल्यानंतर अरुणने भारतीय रेल्वेचे आभार मानले.

मजेदार कमेंट्सचा पाऊस –

या व्यक्तीच्या ट्विटवर लोकांनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, अरुणसाठी हा मोठा संकटाचा काळ आहे, मी त्यांच्या संयमाचे कौतुक करतो. तर आणखी एकाने लिहिलं की, भावाच्या चेहऱ्यावर प्रेशर स्पष्टपणे दिसत आहे पण ओठांवरील हास्याचे उत्तर नाही. तर “देशात स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल मी भावाचे आभार मानतो,” अशीही एका व्यक्तीने कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no water in train man complaint on twitter to tagged the indian railway tweet viral jap