Video: बँक लुटायला आला अन पुरता फसला..शेवटी अग्निशमन दलाने केली मदत; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

दुसऱ्यासाठी केलेल्या खड्ड्यात नेहमी आपलाच पाय अडकतो अशी एक म्हण आहे. याच म्हणीचं जिवंत उदाहरण अलीकडे पाहायला मिळालं.

Video: बँक लुटायला आला अन पुरता फसला..शेवटी अग्निशमन दलाने केली मदत; जाणून घ्या पूर्ण प्रकरण
बँक लुटायला आला अन पुरता फसला (फोटो: ट्विटर/ AFP)

दुसऱ्यासाठी केलेल्या खड्ड्यात नेहमी आपलाच पाय अडकतो अशी एक म्हण आहे. याच म्हणीचं जिवंत उदाहरण अलीकडे पाहायला मिळालं. एएफपी न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार अलीकडेच एक बँक लुटायला आलेल्या चोराचा प्लॅन असा काही फिस्कटला की त्याच्या मदतीला चक्क अग्निशमन दलाला यावं लागलं. रोम मध्ये घडलेल्या या घटनेत पकडलेल्या या चोराला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहुयात..

रोम मधील एका बँकेवर दरोडा टाकण्यासाठी नेपल्स मधील दोन इटालियन तरुण व रोम मधील दोघांनी मिळून मोठा प्लॅन आखला होता. मीडिया रिपोर्टनुसार १५ ऑगस्ट रोजी अनेक रोमन नागरिक देशाबाहेर जातात व शहर बऱ्यापैकी रिकामेच असते. या संधीचा फायदा घेऊन या दोघांनी बँक लुटून देशातून फरार होण्यासाठी तयारी केली होती. बँकेपासून काही अंतरावर असणाऱ्या भाड्याच्या दुकानाखालुन त्यांनी बँकेपर्यंत जाणारा मोठा भोगदा खणायला घेतला. चोरी झाल्यावर इथूनच पळ काढण्याचा त्यांचा विचार होता.

पण आयत्या वेळी या खोदलेल्या भोगद्यातील माती सरकून भोगदा कोलमडला आणि मातीचा मोठा ढिगारा खाली ढासळला. त्यावेळी या दोघांमधील एक चोर त्या ढिगाऱ्याखालीच अडकून बसला. दुसरा काहीच मार्ग नसल्याने या तरुणाच्या मदतीसाठी अग्निशमन दलाला तिथे बोलवण्यात आले. स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या डझनभर कर्मचाऱ्यांनी आठ तास खोदकाम करून मग शेवटी या तरुणाला सुखरूप भोगद्यातून बाहेर काढलं.

पहा व्हिडीओ

‘या’ बेडकाची Idea वापरली असती तर.. Titanic चा जॅक वाचला असता! हा तुफान Viral Video पहाच

दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी स्थानिकांमध्ये विचारणा केली असता, आम्हाला हे तरुण रस्त्याचं बांधकाम करणारे वाटल्याने ते चोर असतील असा संशय आला नाही अशा प्रतिक्रिया समोर आल्या. या प्रकरणात सध्या तपास सुरु असून या चारही आरोपींवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thief stuck under tunnel which was digged to rob a public bank firefighters rescue him after 8 hours svs

Next Story
‘या’ बेडकाची Idea वापरली असती तर.. Titanic चा जॅक वाचला असता! हा तुफान Viral Video पहाच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी