फरीदाबादच्या इमारतीच्या बाल्कनीतून एका आईने आपल्या मुलाला लटकवल्याचा व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजवल्यानंतर सोशल मीडियावर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा व्हिडीओ ग्रेटर फरीदाबाद येथील सेक्टर-८२ येथील ग्रँडुइरा सोसायटीच्या ई-ब्लॉकचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोसायटीच्या बाराव्या मजल्याच्या बाल्कनीच्या रेलिंगला धरून एक माणूस लटकून व्यायाम करत आहे. व्हिडीओमध्ये इतर फ्लॅटमधील लोक त्याला समजावून सांगत आहेत. असे करण्यास नकार देत आहे. यादरम्यान फ्लॅटच्या आतून एक मुलगा येतो आणि लटकलेल्या व्यक्तीला आत घेऊन जातो.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

(हे ही वाचा: Viral: …आणि ६० वर्षांचा मजूर झाला मॉडेल; सगळी फोटोग्राफरची कृपा)

ग्रेंडुइरा सोसायटी आरडब्ल्यूएचे अध्यक्ष दीपक मलिक यांनी सांगितले की, व्यक्तीचे वय सुमारे ५६ वर्षे आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतो. त्यांना २८ वर्षांचा मुलगाही आहे. तो भाड्याने राहतो. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरडब्ल्यूएच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सूचना देत समजावले. तसेच भविष्यात असे करू नये असेही सांगितले. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: Viral Video: …आणि त्याने काही सेकंदात घर तयार केलं; बांधकामाची ‘ही’ पद्धत पाहून व्हाल थक्क!)

ते म्हणाले की, घरमालकाला सदनिका रिकामी करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास पुढील कारवाई केली जाईल. पोलिस प्रवक्ते सुबे सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. असा पराक्रम धोकादायक आहे. याचे भान स्वत: लोकांनीच ठेवले पाहिजे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This guy was doing exercise hanging out on twelfth floor of the balcony video viral of the incident ttg