Sick Leave Viral News On Social Media: आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की, इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर केली जाणे. कारण- कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते. पण जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा तर रजा घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि ही सिक लिव्ह काही आधीच सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला ऐन वेळी सुट्टी घ्यावी लागते. मात्र, सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये एका भारतीय कंपनीचा नियम ऐकून तुम्हालाही संताप येईल. कारण- या कंपनीत सीक लिव्ह घ्यायची असेल, तर सात दिवस आधी सांगण्याचा नियम आहे. एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅनेजर आणि तो अशा दोघांमधील चॅटिंग सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ते वाचून आता सर्वच स्तरांतून या कंपनीवर टीका केली जात आहे.

“सीक लिव्हसाठी ७ दिवस आधीच सांगावं लागेल”

प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते. कामाच्या पद्धतीशिवाय कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. दरम्यान, रजा मागणे सोपे नसते. तुम्ही जरी रजा मागितली तरी काही वेळा तुमच्या रजेचा अर्ज फेटाळला जातो. मात्र, आजारी असताना तरी कंपनीने समजून घ्यावे, अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. मात्र, या कंपनीने सिक लिव्ह घ्यायची असेल, तर सात दिवस आधी कळविण्याचा नियम बनवला आहे.

अजब नियमावर कर्मचाऱ्याने दिलं भन्नाट उत्तर

या व्हायरल स्क्रीन शॉटमध्ये तु्म्ही पाहू शकता की, चॅटमध्ये कर्मचारी आजारी असल्यामुळे सुट्टी घेतोय, असं सांगतो. “माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी ऑफिसला येणार नाही.” यावेळी एचआर मॅनेजरने संबंधित कर्मचाऱ्याला, सीक लिव्ह आणि कॅज्युअल लिव्ह घेण्यासाठी किमान सात दिवस अगोदर कळवणं आवश्यक आहे, असे सांगितले. त्यावर कर्मचारी एचआर मॅनेजरला प्रतिप्रश्न करतो की, पुढील सात दिवसांत मी आजारी पडणार आहे हे मला कसं काय कळू शकतं?. कर्मचाऱ्याने दिलेल्या या भन्नाट उत्तराचा आणि या संभाषणाचा स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

पाहा चॅटचे स्क्रिनशॉट्स

हेही वाचा >> सीट पकडताना एस.टीची आणखी एक खिडकी तुटली; आता VIDEO पाहून सांगा नक्की चूक कुणाची?

नेटकरीही संतापले

नेटकरी यावर संतापले असून, हा असा कसा नियम म्हणून या कंपनीवर टीका होत आहे. युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करीत “त्या मॅनेजरलाच विचारा की, तो पुढच्या सात दिवसांत आजारी पडणार आहे का?”