माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला रस्त्याच्या कडेला उभा राहून फुगे विकत आहे. खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला फुगे विकण्यासाठी घडपडतोय. आजुबाजुचे लोकही त्याच्याकडे कुतुहलाने पाहत आहेत. तर कोणी त्याच्याकडचे फुगे विकत घेताना दिसत आहे. या लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: पोलिसांसाठी तो बंदोबस्त नसतो, पांडुरंगाची सेवा असते! विठूनामाचा गजर, वारकऱ्यांसोबत पोलीसही हरिनामात दंग

चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toddlers strugglet to help family to sale ballons heart touching video goes viral on social media srk