अनेकदा लहान मुळं खेळताना असं काही कृत्य करतात की ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडीओ पाहतो ज्यामध्ये लहान मुलांची छोटीशी चूक त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे लहान मुलांवर पालकांनी सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते. कारण थोड्याशा निष्काळजीपणाचे खूप वाईट परिणाम मुलासह पालकांना भोगावे लागतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिलने वॉशिंग सेंटरमध्ये तिची कार थांबवल्याचे दिसत आहे. यावेळी कारमध्ये एक लहान मुलगी मागच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे. महिला कारमधून खाली उतरते आणि न बघताच खिडक्या बंद करते मात्र, यावेळी मुलीने खिडकीबाहेर तोंड काढल्यामुळे तिची मान खिडकीत अडकते आणि खिडकीची काच वरती जाईल तसं तिची मान काचेत अडकते. मुलीची मान खिडकीत दबल्यामुळे तिला मोठ्याने ओरडताही येत नाही आणि तिच्या गळ्याला फास लागतो. मात्र, सुदैवाने मुलीचा विव्हळतानाचा आवाज एका कर्मचाऱ्याला ऐकू जातो आणि तो पटकन तिला काचेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हेही पाहा- पाकिस्तानातील लोकांनीही मान्य केलं भारताचं श्रेष्ठत्व, सोशल मीडियावर सुरु आहे ‘Congratulations Neighbors’ चा ट्रेंड

या घटनेचा व्हिडीओ @NoCapFights नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मुलीची मान कारच्या खिडकीत अडकल्याचे आईच्या लक्षात आले नाही.” अवघ्या २८ सेकंदाची क्लिप पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, कारण ज्या प्रकारे चिमुरडीचा गळा खिडकीच दाबला गेला होता, त्यामुळे तिच्या जिवाचं बरंवाईट होऊ शकलं असतं. सुदैवाने काही सेकंदांपर्यंत मुलीकडे कोणीही लक्ष दिले नाही. मात्र, काही वेळाने एका कर्मचाऱ्याला मुलगी दिसली. त्यानंतर तीन-चार लोकांनी मिळून तिला बाहेर काढले.

२२ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या हा व्हिडीओ आतापर्यंत ४ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ३५ हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “बटण दाबून काच खाली करता येतो. असो, कोणी काहीही म्हणो, मुलांना कधीही एकटं सोडू नये, असा धडा या घटनेतून घेतला जाऊ शकतो.”