अनेक मोठ्या शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त आलेली अनेक बॅचलर्स मुलं भाड्याने घर शोधत असतात. पण अनेक घर मालक बॅचलर्स मुलांना घर देण्यास नकार देतात. त्यामुळे शहरांमध्ये बॅचलर्सना घरं शोधणं एक मोठा टास्क असतो. अनेक घर मालकं केवळ कुटुंबानाच घर भाड्याने देणं पसंत करतात. कारण कुटुंब ही सोसायटी किंवा चाळीतील लोकांना त्रास न देता, साफ-स्वच्छ राहतात असा त्यांचा समज आहे, पण बॅचलर्स तितक्या शांतपणे वराहत नाहीत किंवा घर खराब करतात असे घरमालकांना वाटते. अशापरिस्थितीत काही घर मालक बॅचलर्सना घर भाड्याने देताना अनेक नियम, अटी, कायदे लादतो. यात घरातील जेवणापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या अनेक अटी असतात.
या अटींमुळे बॅचलर्सकडून काही चुका झाल्या तर घरमालकाला त्या दाखवून देता येतात. पण सध्या सोशल मीडियावर काही फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामुळे मोठ्या शहरांमध्ये बॅचलर्सना घरं मिळण्याच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. यात एका बॅचरलने आपल्या घरमालकाच्या घराची इतकी वाईट अवस्था केली आहे जे पाहून तुम्हाला ही प्रश्न पडेल हे घर आहे की कचरा कुंडी.
सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. तर रवी हांडा या युजर्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील घराची अवस्था इतकी वाईट आहे की तुम्ही विचारही करु शकणार नाहीत. एका फोटोमध्ये तर घरात सर्वत्र दारु आणि बिअरच्या बाटल्या पसरलेल्या दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत अतिशय गलिच्छ असं स्वयंपाक घरं दिसतेय. किचनच्या फर्शीवर सगळीकडे धुळ, माती आणि अगदी अस्ताव्यस्त पडलेले खायचे सामान पसरलेले दिसतेय, जे पाहून किचन कित्येक वर्षे साफ केले नाही असे वाटते. तर घराच्या कानाकोपऱ्यातही कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, तर खालच्या फर्शीवरही प्रचंड धुळ आणि घाण दिसत आहे. घरातील एकही वस्तू स्वच्छ तर नाहीच पण जागच्या जागी देखील ठेवलेली नाही. त्यामुळे हे फोटो पाहून प्रश्न पडतो नेमक घर आहे की दार?
केस गळतीच्या समस्येवर तरुणाने शोधला कायमचा उपाय, जो पाहून हसू आवरणे होईल अवघड
हे फोटो बेंगळुरू येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या एका सुशिक्षित अविवाहित तरुणाच्या भाड्याच्या खोलीतील असल्याचे म्हटले जात आहे. फोटोच्या कॅप्शन मध्ये म्हटले आहे की, हेच कारण आहे ज्यामुळे घरमालकांना बॅचलर्सना घरं द्यायला आवडत नाही. सध्या ट्विटरवर हे फोटो ६ लाख २८ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहेत. ज्यावर कमेंट्स करत अनेक युजर्सनी आपले अनुभव शेअर करत आहेत.