Elon Musk यांनी ट्विटवर बदललं नाव, नेटकरी हसून हसून बेजार|twitter ceo elon musk changed his name on twitter users laughing, What his name do you know? | Loksatta

Elon Musk यांनी ट्विटवर बदललं नाव, नेटकरी हसून हसून बेजार

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी आपलं युजरनेम बदललं आहे जे वाचून नेटकरी हसून हसून बेजार झाले आहेत

Elon Musk Changed His Name
एलॉन मस्क यांनी काय ठेवलं स्वतःचं नाव?

ट्विटर आणि टेस्ला ही दोन नावं घेतली की एलॉन मस्क (Elon Musk) हे नाव आपोआप समोर येतंच. ट्विटरचं डील असो किंवा त्यांची इतर ट्विट्स असोत एलॉन मस्क हे कायमच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा त्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ट्विटर अकाऊंटवर त्यांनी स्वतःचं नाव बदललं आहे. एवढंच नाही तर त्यांनी जे नाव स्वतःला ठेवलं आहे ते वाचून नेटकरी हसून हसून बेजार झाले आहेत. एलॉन मस्क हे त्यांच्या हटके ट्विटमुळे कायमच चर्चेत असतात. अशात त्यांनी स्वतःला असं नाव ठेवलं आहे की नेटकरी त्यांना हसत आहेत. आत्तापर्यंत सुमारे ४० हजारहून अधिक लोकांनी एलॉन मस्क यांचं हे ट्विट रिट्विट केलं आहे.

एलॉन मस्क यांनी नावात नेमका काय बदल केला आहे?

Elon Musk यांनी आपलं नाव ट्विटरवर बदलून MR. TWEET असं ठेवलं आहे. ही माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली आहे. एलॉन मस्क पुढे म्हणतात की मी माझं नाव बदललं आहे पण आता मला ट्विटर माझं नाव बदलू देत नाही. मिस्टर ट्विट हे नाव वापरून एका वकिलाने त्यांना संबोधित केलं होतं आणि त्यांच्यासोबत बराच वाद घातला होता. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी स्वतःचं नाव चक्क मिस्टर ट्विट असं ठेवलं आहे.

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क ट्विटर प्रचंड सक्रिय

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे ट्विटरवर प्रचंड सक्रिय असतात. कायमच ते असे काही ट्विट करतात ज्यांची चर्चा रंगते. एकीकडे त्यांनी युजरनेम बदललं आहे तर दुसरीकडे त्यांच्या कंपनीत ऑल इज नॉट वेल असल्याचं चित्र आहे. कारण त्यांच्या कंपनीला महसुलात बरात तोटा झाला आहे. यामुळे एलॉन मस्क यांना सॅन फ्रान्सिस्कोतल्या ऑफिसमधल्या काही वस्तूही विकाव्या लागल्या तर अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून काढूनही टाकलं.

नेटकरी हसून हसून बेजार

एलॉन मस्क यांनी ट्विटरवरच आपलं नाव मि. ट्विट ठेवल्याची माहिती देताच नेटकरी हसून बेजार झाले आहेत. सुमारे ४० हजार नेटकऱ्यांनी त्यांना यावर उत्तरं दिली आहेत. तर सुमारे ४१ हजार नेटकऱ्यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. काही ट्विटर युजर्सनी तुम्हाला बिटकॉईन हे नाव जास्त शोभून दिसेल असा सल्ला दिला आहे. काही नेटकरी तुम्हाला आता लवकरच बॅन केलं जाईल असंही म्हणत आहेत. तुम्हाला परत नाव बदलायचं असेल तर एलॉन मस्क यांच्याशी संपर्क साधा असाही सल्ला काही जणांनी दिला आहे. शेकडो लोकांनी यावर स्मायलीज पोस्ट करत एलॉन मस्क यांना उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 15:04 IST
Next Story
Video: प्रजासत्ताक दिनी ग्रॅमी अवॉर्ड नामांकित अल्बमच्या गायिकेने गायलं वंदे मातरम; अमेरिकेत भारताचा डंका