व्यसनामुळे अनेकांची आयुष्य बरबाद होतात हे आपण सतत ऐकत असतो. शिवाय अशी अनेक उदाहरणं बघत असतो ज्यामध्ये व्यसणामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादी मादक पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांना माहीत असूनही अनेक लोक व्यसन करतात. शिवाय दारु पिणाऱ्यांचे हाल काय होतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दारु पिणाऱ्यांमुळे अनेक अपघात होतात तर ते कधीकधी ते दिवसभर भररस्त्यात पडून राहतात अशी अनेक उदाहरणं आपण पाहत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशाच दोन दारुड्यांचा एक धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक दारु पिणारे दारू प्यायच्या आधी अनेकदा विचार करतील यात शंका नाही. या व्हिडीओत दोन व्यक्ती दारूच्या नशेत लिफ्टच्या दरवाजा तोडून आत पडल्याचं दिसत आहेत, या घटनेचं दृश्य अत्यंत भयंकर आणि अंगावर शहारा आणणारं आहे.

व्हिडिओमध्ये एका मजल्यावरील लिफ्टच्या ठिकाणी दोन मित्र दारुच्या नशेत आल्याचे दिसत आहेत, हे दोघेजण लिफ्टच्या दिशेने जातात आणि ते लिफ्टचे बटण दाबण्यापूर्वीच ते लिफ्टचा दरवाचा तोडून थेट आतमध्ये जाताना दिसत आहेत. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनाचा व्हिडीओ पाहून अनेकांजणांना धक्का बसला आहे.

या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडीओत पुढे काही सुरक्षारक्षक त्या ठिकाणी पोहचतात आणि दारुच्या नशेत लिफ्टमध्ये पडलेल्या दोघांना खूप मेहनतीने बाहेर काढतात. शिवाय या अपघातामधू दोघेही सुखरुप बचावले आहेत. ते सुखरुप बाहेर आल्याचं पाहून अनेकांनी ते सुदैवाने बचावले नाहीतर दारु पिणं त्यांच्या जीवावर बेतलं असतं असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two drunken friends fall straight through the elevator door shocking video goes viral jap