Viral: कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना तेथील नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही विमानाने प्रवास करा, रेल्वे किंवा मेट्रोने प्रवास करत असाल तर अनेक नियम आणि अटीच्या सूचना ऐकल्या असतील. प्रवाशांना विविध सूचना दिल्या जातात. तुम्ही या सूचना ऐकल्याच असतील की, इथे फोटो काढायला मनाई आहे, फाटकापासून दूर उभं राहा, इथे कचरा टाकू नका वगैरे…मात्र, ब्रिटनच्या एका रेल्वे कंपनीने आपल्या प्रवाशांना अशा सूचना दिल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
ट्रेनमध्ये अश्लील व्हिडीओ पाहू नका –
प्रवास करताना ट्रेनमध्ये अश्लील सिनेमे पाहू नका. आपत्तीकारक जोक्स वाचू नका. वाद होईल अशा मुद्द्यांवर चर्चा करू नका, वादग्रस्त मुद्दे चर्चेत आणू नका, असहज आणि व्हल्गर वाटेल असं कोणतंही कंटेट मोबाईलमधून उघडू नका, अशा सूचनाच रेल्वेने प्रवाशांना दिल्या आहेत. मात्र, रेल्वेेच्या या सूचनेनंतर सोशल मीडियातून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनच्या एका रेल्वे कंपनीने प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वेत अश्लील व्हिडीओ पाहू नका, अशा सूचनाच रेल्वेने दिल्या आहेत. प्रवाशांकडून रेल्वेतच अश्लील कंटेट पाहिला जात असल्याने होणाऱ्या मनस्तापातून रेल्वेने या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशांना असं काही पाहायचंच असेल तर त्यांनी घरी जाऊन पाहावं. तिथे कुणाच्याही प्रायव्हसीचं उल्लंघन होणार नाही, असं रेल्वेने म्हटलं आहे.
आमचे प्रवासी आमची जबाबदारी –
आमच्या ट्रेनमधून प्रत्येक वर्षी लाखो लोक प्रवास करत असतात. या प्रवाशांना सुरक्षित आणि सहजपणे इंटरनेट सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे. काही कंटेट प्रत्येकाने पाहावा किंवा ऐकावा असा असत नाही. खासकरून लहान मुलं हा कंटेट पाहू शकत नाही. अशावेळी जो कंटेट आमच्या कार्यक्षेत्रासाठी उपयुक्त नाही, तो प्रवाशांनी पाहू नये. घरी जाईपर्यंत प्रवाशांनी कळ सोसावी आणि घरी गेल्यावर असा कंटेट पाहावा, असं नॉदर्न रेल्वेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ट्रेशिया विलियम्स यांनी सांगितलं
