आईला जगातील सर्वात मोठी योद्धा म्हणतात. कारण आपल्या मुलावर कोणतीही अडचण येण्याआधीच आई त्याच्या मागे उभी असते. आईच्या प्रेमाच्या आणि समर्पणाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील.जशी आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात, त्याचप्रमाणे प्राणी देखील आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि शेवटपर्यंत त्यांचे संरक्षण करतात. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालत मुलांचा जीव वाचवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर आम्ही आईच्या शौर्याबद्दल बोलत आहोत कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका म्हशीने आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी असा पराक्रम केला आहे, जो फक्त एक आईच करू शकते. ७ सिंह एका तान्ह्या म्हशीवर लक्ष ठेवत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. म्हशीचे बाळ इतके लहान आहे की त्याला नीट उठताही येत नाही. पहिल्या दोन सिंहीणी म्हशीची शिकार करायला येतात. हे सर्व पाहून म्हैस अॅक्टिव्ह मोडमध्ये येते आणि आपल्या बाळाचे संरक्षण करू लागते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: गरिबाच्या झोपडीत टाकला प्रकाश! तरुणीनं घडवलं माणुसकीचं दर्शन

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला सुद्धा लाखो व्ह्यूज आहेत. नेटकऱ्यांना प्राण्यांची लढाई व त्यांची हुशारी पाहणे आवडते हे या व्ह्यूज व कमेंट्समधून दिसून येते. अंगावर काटा आणेल असा हा जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जंगलात काही वेळा प्राणी माणसांच्या विचारापलीकडे जाईल अशी भांडणे करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video animal fight lion running buffalo lions attack buffalo with newborn calf shocking video viarl this viral clip will bring goosebump srk