Congress MLA Bus Collides Video: कर्नाटकात सत्तेवर येताच सिद्धारमैया सरकार महिलांसाठी मोफत बस सेवा म्हणजेच ‘शक्ती योजना’ सुरु केली. या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस महिला आमदार रूपकाला यांनी महिलांमध्ये मोफत बस पास वाटले. एवढंच नव्हे तर त्यांनी चक्क ड्रायव्हर सीटवर बसून बस चालवणार असल्याचे सुद्धा सांगितले. दरम्यान या सगळ्या प्रयोगात त्यांच्याकडून एक चूक घडलीच आणि आता त्याचा फटका अनेकांना बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदर घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे ज्यामध्ये रूपकला या ड्रायव्हरच्या मदतीने बस चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, यावेळी बसमध्ये अनेक महिला प्रवासी सुद्धा बसलेल्या आहेत. जेव्हा बस चालवण्याची वेळ येते तेव्हा रूपकला यांनी चुकून रिव्हर्स गिअर टाकला आणि यामुळे बसच्या मागे उभ्या अनेक गाड्या कोलमडून पडल्या. यानंतर मग ड्रायव्हरने स्वतः स्टेअरिंग हातात घेतले.

हा प्रकार व्हायरल होताच अनेकांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. “परवाना नसताना या आमदार बाईंना गाडी चालवण्याची मुभा कशी काय दिली?” “काँग्रेसची ही सवयच आहे, फायद्यातही नुकसान करणारच”अशा पद्धतीच्या कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

Video : काँग्रेसच्या महिला आमदारांचा प्रताप

हे ही वाचा<< बेबी सीटर महिलेने बाळाला मांडीवर घेत भरवताना…; Video व आईची पोस्ट वाचून लोकांनी ‘आई’लाच रागात सुनावलं

दुसरीकडे, कर्नाटक काँग्रेस सरकारच्या ‘शक्ती योजनेची’ चांगलीच चर्चा सुरु आहेत. रविवारपासून सुरु झालेल्या या सुविधेचा लाभ घेऊन तब्बल ४१. ८ लाख महिला आता सरकारी तिजोरीच्या जोरावर प्रवास करू शकणार आहेत. यासाठी वार्षिक ४,०५१.५६ कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहेत. राज्यातील मूळ निवासी महिलांना यापुढे राज्याच्या सीमांतर्गत प्रवास मोफत असणार आहे .

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video congress announce free bus rides for ladies women mla drives bus mistakes gear crashed bikes and cars wasted lakhs money svs