Viral Video : क्रिकेट हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. सामना कोणताही असो क्रिकेटप्रेमी आवडीने बघतात आणि जर त्यांचा आवडता खेळाडू बॅटिंग किंवा बॉलिंग करत असेल तर क्रिकेट पाहायची मजा दुप्पट होते. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूविषयी जाणून घ्यायला आवडते. त्यांचे छोटे छोटे व्हिडीओ रील्स बघायला आवडते. पापराजी नेहमी क्रिकेटर्सचे छोटे मोठे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटो काढणाऱ्या पापाराजीची भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मजा घेताना दिसतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रोहित शर्माच्या शेजारी ऋषभ पंत सुद्धा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने फोटोग्राफरची घेतली फिरकी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रोहित शर्मा आणि ऋषभ पंत मैदानाकडे बघत बालकनीत उभे आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रोहित शर्मा हात वर करून आळस काढताना दिसतो. तितक्यात त्याचं लक्ष त्याचा फोटा काढणाऱ्या एका फोटोग्राफरकडे जाते. हे पाहून रोहित म्हणतो, “क्या यार ऐसा करता हू तभी खिचते हो”
ऋषभ पंत – अच्छी फोटो खिचो
फोटोग्राफर – कैसी अच्छी कुछ बोलो, तब खिचुंगा अच्छी”
ऋषभ पंत – बढिया बोलते है बेटा
रोहित पोझ देतो आणि फोटोग्राफर फोटो काढतो.
फोटोग्राफर – अब ये हो गई सुपरहिट
ऋषभ पंत – ये वाली अच्छी है
फोटोग्राफर – वर्ल्ड एक्स्लुझिव्ह
ऋषभ पंत – बॅट्समन

सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DDg38P4Bklq/?igsh=cXJ4Mm82cGxla3Jq

rishabh_vansh17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चांगला फोटो काढा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ऋषभ पंत तुम्हाला कधीही निराश करणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “रोहित खूप छान मुलगा आहे. नेहमी खूश राहतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “ऋषभ पंतसारखा कोणी नाही” एक युजर लिहितो, “कॅमेरामन रोहितला सोडत नाही आणि रोहित कॅमेरामनला सोडत नाही” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video cricketer rohit sharma along with rishabh pant make fun with photographer and said click good pic watch funny video ndj