सोशल मीडियावर अनेकदा एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टॅलेंटने भरलेले काही उत्कृष्ट व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्यांच्या कलेची खात्री पटेल. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन देखील कलाकाराचं टॅलेंट पाहून थक्क झालेला दिसला. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या कलाकाराच्या टॅलेंटचं कौतुक कराल. अनेकांना त्यांच्या कामामुळे नाव मिळते. असच एका टॅलेंटे दर्शवणाऱ्या कालकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, कलाकार विलास नायक भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचे लाइव्ह पोर्ट्रेट बनवताना दिसत आहेत. लाइव्ह पोर्ट्रेट पाहून तिथे उपस्थित असलेला शिखर धवनही खूपच आश्चर्यचकित दिसला.

व्हिडीओमध्ये, कलाकार विलास नायक, शिखरचे लाइव्ह पोर्ट्रेट बनवताना, आपल्या ललित कलेच्या मदतीने कॅनव्हासवर आपल्या हातांनी जादू करताना दिसत आहे. नुकतेच क्रिकेटर शिखर धवनच्या फाउंडेशनने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या टॅलेंटने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

(हे ही वाचा: Viral Video: एकापाठोपाठ एक अनेक हरणांनी मिळून केला बारवर हल्ला; कारण…)

(हे ही वाचा: “तुमच्यापैकी कोणी रडत का नाही?…” लग्नानंतर सासरी जाताना वधूने कुटुंबीयांना विचारला प्रश्न; मजेशीर उत्तराचा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ ५२ हजाराहून अधिक लोकांनी पहिला आहे. त्याचबरोबर व्हिडिओतील कलाकाराची कलाकृती पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. व्हिडीओवर यूजर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘सुपर माइंड ब्लोइंग आर्ट.’