Viral Video : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. या शिवजयंती निमित्त देशभरात हजारो ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. त्यांचे विचार प्रत्यक्ष आयुष्यात आत्मसात करून महाराष्ट्रीयन लोक त्यांना आपला आदर्श मानतात. सध्या सगळीकडे शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या फोटोमध्ये गाडीची नंबरप्लेट दिसत आहे. ही नंबरप्लेट पाहून कोणीही थक्क होईल. कारण ही अत्यंत सामान्य नंबर प्लेट नाही तर ही जगातील सर्वात भारी नंबरप्लेट आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नंबरप्लेटमध्ये नेमकं आहे तरी काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओ मध्ये नंबर प्लेट दिसेल. या नंबर प्लेटवर लिहिलेय,

“महाराष्ट्र १२
एमटी १४ १९”

या व्हिडीओत तुम्हाला ही नंबर प्लेट का खास आहे, याविषयी सांगितले. व्हिडीओमध्ये या नंबर प्लेटचे वैशिष्ट्य सांगताना लिहिलेय,
“महाराष्ट्र १२ जानेवारी जिजाऊजयंती
एमटी १४ मे शंभू जयंती, १९ फेब्रुवारी शिवजयंती”

ही नंबर प्लेट पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Video)

https://www.instagram.com/reel/DFUJ0I6zrZY/?igsh=MTl5Ym5xaGExZDJtMA%3D%3D

its_yashuuuu_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “१०० टक्के खरं आहे”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जगातील सर्वात vip नंबर प्लेट” तर एका युजरने लिहिलेय, “जगातील सर्वात सुंदर नंबर प्लेट. जय शिवराय” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच छान नंबर प्लेट बनवले दादा तू. जय शिवराय जय शंभूराजे” एक युजर लिहितो, “एक मराठा कोटी कोटी मराठा” तर एक युजर लिहितो, “नशीब लागतं असा नंबर प्लेट मिळायला” अनेक युजर्सनी ‘जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे’ अशा घोषणा लिहिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video do you see a beautiful number plate only shivpremi can understand the value of it video goes viral ndj