Viral Video : पेट्रोल पंपावर आग लागल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. कधी ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे तर कधी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे अनेकदा आग लागल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल पेट्रोल भराताना गाडीने पेट घेतला. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. तेथील कर्मचाऱ्याच्या हिंमतीने मोठा अनर्थ टाळता आला. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

पेट्रोल भरताना दुचाकीने घेतला पेट

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक दुचाकी चालक पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येतो. तेथील कर्मचारी दुचाकीत पेट्रोल भरत असतो अचानक गाडी पेट घेते. चालक आधी आग विझवण्याचा प्रयत्न करतो पण आग जास्त वाढलेली पाहून तो दुचाकी तशीच खाली टाकतो आणि दुचाकीवरून खाली उतरतो. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी अग्निशामक सिलेंडर काढतो आणि पेटत्या दुचाकीवरील आग विझवतो. या कर्मचाऱ्याच्या हिंमतीने मोठा अपघात टाळता आला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, हा व्हिडीओ बुलढाणा येथील आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

vidarbh.kida या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “त्या मालकाला म्हणा असा सहकारी मिळणे खूप अवघड आहे याला काही कमी नको पडू देऊ” तर एका युजरने लिहिलेय, “ज्यांनी प्रशिक्षण दिले आहे त्यांना व मित्रा तुझ्या कार्याला सलाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रशिक्षण दिलं जातं पण धाडस चांगल दाखवलं भावाने” एक युजर लिहितो, “परिस्थिती आणि संयम” अनेक युजर्सनी या कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहे. यापूर्वी सुद्धा पेट्रोलपंपावरील अशा अनेक घटना व्हायरल झाल्या आहेत. पेट्रोलपंपावर सतर्कतेने राहणे खूप गरजेचे आहे.